11 INDIA Bloc Leaders File Petition Against Election Commission
esakal
मतदार यादीतील कथित अनियमितता आणि मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळल्याच्या आरोपांवरून विरोधकांनी आता सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी संध्याकाळी निवडणूक आयोगाविरोधात वैयक्तिकरीत्या याचिका दाखल केली. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (SIR) स्थगिती द्यावी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आल्याची माहिती आहे.