राहुल परदेशात; सभा पुढे ढकलली | Punjab Assembly Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi abroad meeting was postponed Punjab Assembly Election

राहुल परदेशात; सभा पुढे ढकलली

चंडीगड : पंजाब विधानसभा निवडणुकीचे (Punjab Assembly Election) पडघम वाजत असून सर्व पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. यानुसार प्रदेश काँग्रेसच्या वतीने ३ जानेवारी रोजी मोगा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) परदेशात गेल्याने ३ तारखेची सभा पुढे ढकलल्याचे सूत्राने सांगितले. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी देखील राहुल गांधी परदेशात गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा: 'निष्काळजी राहू नका'; आरोग्य सचिवांचं जिल्हाधिकाऱ्यांना इशाऱ्याचं पत्र

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे यंदा नवीन वर्ष इटलीमध्ये साजरे करू शकतात. मागील वर्षाप्रमाणेच ते आपल्या आजीसमवेत राहणार असल्याचे समजते. रणदिप सुरजेवाला म्हणाले की, राहुल गांधी यांचा हा खासगी दौरा आहे. भाजप आणि त्यांच्या माध्यम मित्रांनी या दौऱ्याबाबत अनावश्‍यक अफवा पसरू नयेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे १५ आणि १६ जानेवारी रोजी पंजाब आणि गोवा येथे सभा घेऊ शकतात.

आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच गटबाजी आणि अनेक नेते पक्ष सोडून गेल्याने पंजाब प्रदेश कॉंग्रेसला अडचणींचा सामना करावा लागत असताना राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्याने अडचणीत भर घातली आहे. एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ३ जानेवारी रोजीची मोगा सभा ही कॉंग्रेसचे शक्ती प्रदर्शन म्हणून पाहिली जात होती. यादृष्टीने तयारी केली जात होती. परंतु ते परदेशात गेल्याचे आम्हाला ठावूक देखील नाही. आम्हाला परदेश प्रवासाची माहिती मिळाली तेव्हा विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. पंजाब प्रदेश काँग्रेसच्या नेत्याने सभा स्थगित केल्याचे सांगितले. राहुल गांधी,

हेही वाचा: मुंबईत कोरोनाचा उद्रेक; नव्या रुग्णांनी साडेपाच हजारांचा टप्पा गाठला!

मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, पंजाबचे नेते नवज्योत सिंग सिद्धू आणि अन्य नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे पंजाब काँग्रेसची एकजूट दिसेल. तसेच राहुल गांधी परदेशात गेल्याने उमेदवारी जाहीर होण्याच्या प्रक्रियेला देखील विलंब होईल, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top