Rahul Gandhi flight go around
esakal
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या लखनऊ दौऱ्यापूर्वी त्यांच्या विमानाला लँडिंगच्या वेळी गो-अराउंड करावं लागल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीहून लखनऊला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला पहिल्या प्रयत्नात लॅंडिंग करता आलं नाही. मात्र, पायलटने परिस्थितीचा अंदाज घेत पुन्हा सुरक्षित लँडिंग केलं. या घटनेनंतर आता विविध चर्चांना उधाण आलं आहे.