JNU Violence : 'जेएनयू'तील हिंसाचारानंतर राजकारण पेटले

वृत्तसंस्था
Monday, 6 January 2020

जेएनयूची घटना समजल्यानंतर धक्का बसला

-  अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयू) आज रात्री पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. या घटनेचा देशभरातून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि तज्ज्ञांनी कठोर शब्दांत निषेध केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'जेएनयू'तील या हिंसाचारावरून राजकारण पेटले असून, आम आदमी पक्षाने या हिंसाचारासाठी सत्ताधारी भाजपला जबाबदार ठरविले असून, विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे. कॉंग्रेसने विद्यार्थ्यांवरील हल्ल्यास सरकारचे पाठबळ असल्याचा आरोप केला आहे. 

#JNU :'जेएनयू'मध्ये पुन्हा राडा; विद्यार्थी संघटनेची प्रमुख जखमी

जेएनयूमध्ये हल्ला झाल्याची माहिती मला मिळाली. गुंडांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना रॉड आणि काठ्यांनी मारहाण केल्याचे समजले. तसेच यातील एका विद्यार्थ्याने सांगितले, की पोलिसांनी माझ्या डोक्यावर अनेकदा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे ट्विट प्रियांका गांधी यांनी केले. 

जेएनयूची घटना समजल्यानंतर धक्का : अरविंद केजरीवाल

जेएनयूमधील हिंसाचाराची घटना समजल्यानंतर मला धक्काच बसला, विद्यार्थ्यांवर क्रूरपणे हल्ले करण्यात आले. पोलिसांनी तातडीने हिंसाचार थांबवून शांतता कायम ठेवावी. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थीच सुरक्षित नसतील तर देशाची प्रगती कशी होईल?, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.  

'जेएनयू'मध्ये गुंडांचा धुडगूस; विद्यार्थी, शिक्षकांना रॉडने मारहाण

देशाचे नियंत्रण फॅसिस्ट शक्तींच्या हाती : राहुल गांधी

काही मुखवटाधारी गुंडांनी जेएनयूतील विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ले केले यामध्ये काही जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या देशाचे नियंत्रण फॅसिस्ट शक्तींच्या हाती असल्याने ते शूर विद्यार्थ्यांच्या आवाजाला घाबरतात. आज विद्यापीठात झालेल्या हिंसाचारातून त्यांच्या भीतीचे प्रतिबिंब उमटते. 

JNU Violence : योगेंद्र यादव यांना धक्काबुक्की (व्हिडिओ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi and Priyanka Gandhi and arvind kejriwal commented on JNU Violence