बघा, गद्दार चालले! काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या केंद्रीय मंत्र्याला राहुल गांधींनी डिवचलं; मंत्री म्हणाले, हे देशाचे शत्रू

Rahul Gandhi : संसदेबाहेर विरोधकांच्या आंदोलनावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्यात शा‍ब्दिक चकमक झाली. दोघांचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Rahul Gandhi and Ravneet Singh Bittu clash outside Parliament

Rahul Gandhi and Ravneet Singh Bittu clash outside Parliament

Esakal

Updated on

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातल्यानं कामकाज तहकूब करण्यात आलंय. यावेळी संसद भवन परिसरात विरोधकांनी आंदोलन केलं. या आंदोलनावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्यात शा‍ब्दिक चकमक झाली. दोघांचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात राहुल गांधी हे बिट्टू यांना गद्दार म्हणतात तर बिट्टू यांनी राहुल गांधींना देशाचा शत्रू असं म्हटलं. बिट्टू हे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com