

Rahul Gandhi Press Statement
esakal
Rahul Gandhi Latest Statement : केंद्रातील सत्ताधारी सरकारमध्ये अंतर्गत अस्वस्थता असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. केंद्र सरकारमधील काही मंत्री विरोधकांच्या संपर्कात असून, सरकारमधील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती विरोधकांना देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुढील आठ महिन्यांत या घडामोडींचे परिणाम दिसून येतील, असे सूचक विधानही राहुल गांधी यांनी केले.