राहुल गांधी प्रकरणात नवा ट्विस्ट; वकील कपिल सिब्बल यांची महत्त्वाची माहिती

Rahul Gandhi Disqualified
Rahul Gandhi Disqualifiedesakal

चोरों का सरनेम मोदी क्यो होता है… काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं हे विधान त्यांना भोवलं आहे. या मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना जामीनही मंजूर केला आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत:कोर्टात उपस्थित होते. मात्र या निकालावर राज्यसभेचे खासदार वकील कपिल सिब्बल यांनी टिप्पणी केली आहे.

ते म्हणाले की, "हा मानहानीचा खटला होऊ शकत नाही कारण राहुल गांधींनी फक्त काही लोक चोर आहेत असे म्हटले होते. त्यांनी नीरव मोदी, ललित मोदी आणि आणखी एका मोदीचे नावं घेतले होते. मात्र मानहानीचा खटला व्हायला पाहिजे होता तर या राहुल गांधी यांनी ज्या लोकांची नावे घेतली त्या लोकांमधील कोणीही खटला दाखल करायला पाहिजे होता, पण तस न होता. सुरतमधील एका मोदी नावाच्या व्यक्ती कडून खटला चालवला जात आहे, त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही." अशी टिप्पणी वकील कपिल सिब्बल यांनी केली आहे.

Rahul Gandhi Disqualified
Indore Temple Accident: इंदूरमधील मंदिर दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू, सरकारकडून मदत जाहीर

राहुल गांधी यांच्या त्या विधानामुळे संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान झाल्याचा दावा भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणी कोर्टात केस दाखल केली होती.

चार वर्षापूर्वीच्या या प्रकरणावर मागील आठवड्यात सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर सुरत जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला. या प्रकरणात कोर्टाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षाची शिक्षा सुनावली.

Rahul Gandhi Disqualified
Aligarh Fire News: शॉर्टसर्किटमुळे SBI बँकेला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल

या पाठोपाठ लोकसभा सचिवलयाने राहुल गांधी यांच्यावर कारवाई करत त्यांची खासदारकी रद्द केली. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली विविध राजकीय विरोधी पक्षांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या तर काँग्रेसने देशभराच आंदोलन केलं.

खासदारकी गेल्यानंतर देखील राहुल गांधी डगमगले नाहीत. उलट त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तर राहुल गांधी यांची खासदारकी अदानीच्या मुद्दावर आवाज उठवत आहेत, म्हणून रद्द करण्यात आली असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com