राहुल गांधींचे प्रयत्न निष्फळ! MK Stalin त्यांच्या भूमिकेवर ठाम; मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दिला पाठिंबा

Rahul Gandhi Fails to Convince MK Stalin : केंद्र सरकारने विधेयकात द्रमुकने उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे आता विरोध करण्याचा प्रश्नच येत नसल्याचं स्टॅलिन यांनी स्पष्ट केलं.
Rahul Gandhi

Rahul Gandhi

esakal

Updated on: 

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून इंडिया आघाडीतील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी या विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेस अध्यक्षांसह आघाडीतील अनेक नेते चेन्नईत पोहोचले होते. मात्र, स्टॅलिन यांनी आपली भूमिका बदलण्यास नकार दिल्याने या बैठकीत तोडगा निघू शकला नाही. केंद्र सरकारने विधेयकात द्रमुकने उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे आता विरोध करण्याचा प्रश्नच येत नसल्याचं स्टॅलिन यांनी स्पष्ट केलं.

Loading content, please wait...