Rahul Gandhi Reacts After Sonam Wangchuk Hospitalisation
esakal
सोनम वांगचुक यांना उपोषणस्थळावरून दिल्ली पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यानंतर या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.