

NEET Paper Leak Protests
esakal
High political drama in New Delhi: नीट पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीचे अनेक नेते गुरुवारी सायंकाळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी बैठकीसाठी पोहोचले होते.
बैठक संपल्यानंतर सर्वांना घेऊन राहुल गांधी बसमधून रवाना झाले. राहुल गांधी म्हणाले की, नीट पेपर फुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि अलीकडच्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या विद्यार्थ्यांविषयी सहानुभूती व्यक्त करण्यासाठी आम्ही निघालो आहोत.