esakal | भूकबळीत भारताची दैना; खास लोकांचे खिसे भरण्यात मोदी मात्र व्यस्त
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत 2014 साली 55 व्या स्थानावर होता. मात्र आता 2020 मध्ये भारत 94 क्रमाकांच्या स्थानावर आला आहे.

भूकबळीत भारताची दैना; खास लोकांचे खिसे भरण्यात मोदी मात्र व्यस्त

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे विविध मुद्यांवरुन नेहमीच नरेंद्र मोदींना आणि भाजपा सरकारला धारेवर धरत असतात. आपल्या ट्विटरवरुन ते अनेक विषयांना वाचा फोडत केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असतात. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधींनी भारताच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेबाबत, सुधारित कृषी कायद्यांबाबत, युवकांच्या  बेरोजगारीबाबत मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. सध्या परत एकदा राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जागतिक भूकबळीच्या 2020 च्या स्थितीबाबत भारताच्या अवस्थेवरुन त्यांनी मोदी सरकारला जबाबदार धरलं आहे. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये म्हणजेच भूकबळी प्रकरणात 107 देशांपैकी भारताला 94 व्या स्थानावर ठेवण्यात आले आहे. 

हेही वाचा - Corona Update: गेल्या 24 तासांत 62,212 नवे रुग्ण; बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने दिलासा

यावरुन टीका करताना राहुल गांधी यांनी म्हटलंय की, भारतातील गरिब भूकेला आहे कारण सरकार फक्त आपल्या काही मोजक्याच मित्रांचे खिसे भरण्यात व्यस्त आहे... या रिपोर्टनुसार, सध्या भारत 94 व्या स्थानावर आहे. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत 2014 साली 55 व्या स्थानावर होता. 2019 मध्ये भारत 102 क्रमाकांच्या स्थानावर आला होता तर आता 2020 मध्ये 94 व्या स्थानावर भारत आहे. 

या ट्विटमध्ये त्यांनी भूकबळीनुसार देशांची क्रमवारी असलेल्या एका आलेखाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये इंडोनेशिया, नेपाळ,  बांग्लादेश आणि पाकिस्ताननंतर भारताचा क्रमांक लागत असल्याचे दिसून येत आहे. भारत या क्रमवारीत तब्बल 94 व्या स्थानावर असल्याची माहिती राहुल गांधी यांनी दिली आहे. तर आपल्यापेक्षा गरिब आणि अविकसित असणाऱ्या देशांची याबाबतची परिस्थिती अधिक चांगले असल्याचे हा रिपोर्ट सांगतो असं राहुल गांधींनी माहिती दिली  आहे. याद्वारे इतर देशांहून भारताची परिस्थिती गंभीर आहे,  हे दिसून येत आहे. याचाच हवाला देत त्यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. शिवाय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील  हे सरकार फक्त काही मोजक्या उद्योगपतींचेच खिसे भरण्यात व्यस्त आहे आणि त्यांच्यासाठीच काम करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. 

हेही वाचा - कोरोनाविरोधातील लढाईसाठी पुढील अडीच महिने महत्त्वाचे, आरोग्य मंत्र्यांचा इशारा

सध्या राहुल गांधी यांनी याप्रकारे ट्विटरवरुन मोदी सरकारवर टीका करण्याचा सपाटाच लावला आहे. याआधीही त्यांनी कोरोनाची परिस्थिती हाताळण्यावरुन इतर देशांपेक्षा भारताला आलेल्या अपयशावरुन मोदी सरकारवर टिका केली होती.