Corona Update: गेल्या 24 तासांत 62,212 नवे रुग्ण; बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने दिलासा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

सापडलेल्या नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही अधिक असल्याने ही दिलासादायक बाब आहे. 

नवी दिल्ली : भारतासहित जगभरातील 180 हून अधिक देशांत कोरोना व्हायरसचा कहर माजलेला दिसून येत आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. भारतातदेखील कोरोनाचा हाहाकार माजला असून हजारो लोक मृत्यूमुखी पडले आहेत. आतापर्यंत जगात 3.93 कोटीहून अधिक लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. भारतात दररोज या विषाणूच्या संक्रमणाचे रुग्ण वाढतच आहेत. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, देशांत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ही 74,32,680 इतकी झाली आहे. 

हेही वाचा - कोरोनाविरोधातील लढाईसाठी पुढील अडीच महिने महत्त्वाचे, आरोग्य मंत्र्यांचा इशारा

गेल्या 24 तासांत कोरोनाचे 62,212 नवे रुग्ण भारतात सापडले आहेत. शुक्रवारी सकाळी आठपासून ते शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. या 24 तासात 70,816 इतके रुग्ण बरे झाले. सापडलेल्या नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही अधिक असल्याने ही दिलासादायक बाब आहे. 

हेही वाचा - 'ठणठणीत' लोकांनो हात धुवत रहा; 2022 पर्यंत तरी तुम्हाला लस नाही

तर 837 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत भारतात या संक्रमणाच्या तावडीत सापडलेल्या 65,24,595 रुग्णाची सहिसलामत सुटका झाली आहे. तर देशात 1,12,998 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात 7,95,087 इतके ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 9,99,090 टेस्ट झाल्या आहेत. आतापर्यंत आपल्या देशात 9,32,54,017 इतक्या टेस्ट झाल्या आहेत. 

काळजी घ्या... 

WHOच्या संशोधक सौम्या स्वामिनाथन यांनी काल म्हटलंय की 2021 च्या अखेरपर्यंत एक प्रभावी लस जरुर येईल मात्र ती मर्यादीत प्रमाणात असेल.  त्यांनी म्हटलंय की, सामान्य ठणठणीत माणसापर्यंत लस पोहचायला 2022 साल उजाडू शकतं. 2021 मध्ये लस तर असेल मात्र ती मर्यादीत असेल. आलेली लस ही सगळ्यात आधी आरोग्य कर्मचारी आणि अशा काही लोकांना दिली जाईल ज्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका अधिक आहे. त्यामुळे, हात धुणे, मास्क वापरणे आणि सोशल डिस्टंन्सिगचे पालन करणे अनिवार्य आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona update in india 17 october coronavirus india report marathi