Rahul Gandhi : ‘मतचोरी’च्या आरोपांवर राहुल गांधी आक्रमक; मोदी-शहा यांच्या चौकशीची मागणी, ज्ञानेशकुमारांना ‘माफीचे साक्षीदार व्हा’चा सल्ला

Gyanesh Kumar Asked to Resign as CEC : राहुल गांधी यांनी २०२४ लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ‘मतचोरी’ झाल्याचा आरोप पुन्हा केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत मोदी-शहा यांच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली.
Rahul Gandhi

Rahul Gandhi

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर आल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतांची चोरी झाल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतरच्या सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची चौकशी व्हावी, अशी मागणी राहुल यांच्याकडून करण्यात आली.

वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना राहुल गांधींनी ‘माफीचा साक्षीदार बना’ असा सल्लाही दिला. काँग्रेस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही कडाडून हल्ला चढविला. ‘भाजपची सत्ता ५० वर्षांपर्यंत राहील,’ या आशयाचे दावे करणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांचे व्हिडिओ दाखवून राहुल यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली.

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांना आतापर्यंत सत्ताविरोधी जनभावनेला का सामोरे जावे लागले नाही? या प्रश्नाचे उत्तर दोन्ही निवडणूक आयुक्तांनी दिले असल्याचा टोलाही राहुल यांनी लगावला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करताना त्यांनी निवडणुकांच्या चोरीचे कारस्थान रचण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांची चौकशी करण्यात येईल, असा इशारा दिला.

ज्ञानेशकुमार यांनी हे समजून घ्यावे की त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी चांगले काम केले आहे. आता त्यांनी माफीचा साक्षीदार व्हावे, असा सल्ला राहुल गांधी यांनी दिला.

मतचोरीच्या मुद्द्यांवरून विरोधकांमध्ये शंभर टक्के सहमती असल्याचे सांगताना याविरोधात काँग्रेस पक्ष अन्य विरोधी पक्षांसोबत काम करणार असल्याचे ते म्हणाले.

Rahul Gandhi
Maharashtra Rain Alert : गणरायाच्या निरोपाला पाऊस हजेरी लावणार ! २१ जिल्ह्यांना यलो-ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या तुमच्या भागात कसे असेल हवामान?

कारस्थानाचा आरोप

मोदी, शहा यांच्यासोबतच सरसंघचालक मोहन भागवत, उद्योगपती गौतम अदानी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, ज्ञानेशकुमार तसेच अन्य व्यक्तींची छायाचित्रे पडद्यावर झळकावून राहुल गांधींनी आरोप केला की देशाचे मतदान नष्ट करण्यात आले असून त्यामागे हे षडयंत्रकर्ते आहेत.

सर्व कायदेच बेकायदा

मतांची चोरी झाली असून चोरीच्या मतांवर सर्व खासदार निवडून आले असल्याने त्यांनी संमत केलेले सर्व कायदेच बेकायदा असल्याचा दावा त्यांनी केला. मतचोरीचा मुद्दा आपण तीन वर्षांपासून सर्व पुराव्यांनिशी मांडत असल्याचे सांगताना राहुल यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाना या विधानसभा निवडणुकांनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदांची आठवण करून दिली.

Rahul Gandhi
Asian Games 2026: भारताची 'सुवर्ण' सुरूवात! सुरूची सिंग, कमलजीत 'Gen Z' चा आशियाई विक्रमासह गोल्डन निशाणा

"भाजपने कोणतीही निवडणूक हवेत जिंकलेली नसून गेल्या सत्तर वर्षांपासून उत्तरोत्तर विजयी वाटचाल करीत निवडणुकांमध्ये यश मिळविले आहे. राहुल गांधी यांचे राजकीय ज्ञान शून्य असून त्यांनी मांडलेल्या मुद्यांत स्पष्टता दिसत नाही."

- सुधांशू त्रिवेदी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते

संरक्षणासाठी कायदा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या नियुक्तीवरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य करताना राहुल गांधी म्हणाले, की २१ डिसेंबर २०२३ ला पंतप्रधान मोदींनी संसदेत मुख्य निवडणूक आयुक्तांना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण देणारा कायदा आणला. त्यानंतर आपण १७ फेब्रुवारी २०२५ ला विरोधात मतप्रदर्शन करूनही पंतप्रधान मोदींनी ते धुडकावून ज्ञानेशकुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नेमणूक केली.

त्यावेळी दोघांचे पत्र

‘‘महादेवपुरा येथील मतचोरी, व्होटर अधिकार यात्रा तसेच आळंद येथील मतचोरी हे मुद्दे आपण उपस्थित केले,’’ असे राहुल गांधींनी सांगितले. त्याचवेळी २८ ऑगस्ट २०२५ ला दोन निवडणूक आयुक्त सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी यांनी या गैरप्रकाराला विरोध दर्शविणारे पत्र लिहिले होते, असेही ते म्हणाले.

आपल्याकडे पुरेशी माहिती

येत्या ३-४ महिन्यांत सर्वांना समजेल, की २०२४ ची निवडणूक आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची चोरी झाली होती, असा खळबळजनक दावा करताना राहुल गांधींनी याबाबत आपल्याकडे पुरेशी माहिती असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com