स्पेशल ट्रेनच्या बूकिंगला आजपासून सुरुवात; प्रवाशांसाठी रेल्वेच्या अटी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

 रेल्वे 12 सप्टेंबरपासून 80 विशेष ट्रेन सुरु करणार आहे. या ट्रेनचे तिकिट बुकिंग आजपासून (10 सप्टेंबर) होणार आहे. 

नवी दिल्ली - रेल्वे 12 सप्टेंबरपासून 80 विशेष ट्रेन सुरु करणार आहे. या ट्रेनचे बुकिंग आजपासून (10 सप्टेंबर) होणार आहे. या सर्व ट्रेन्स राखीव असतील. यामुळे ट्रेनमधून फक्त कन्फर्म तिकिट असलेल्यांनाच प्रवास करता येणार आहे. यासाठी ट्रेनचं रिझर्व्हेशन करावं लागेल. यासाठी IRCTC च्या संकेतस्थळावरून ट्रेनचं बुकिंग करता येईल. याशिवाय रेल्वेच्या रिझर्व्हेशन काउंटरवरून तिकिट बुक करू शकता. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिकिट काउंटरवरून बूकिंग करता येईल मात्र सोशल डिस्टन्सिंगचं पालन काटेकोर करावं लागेल. त्याऐवजी ऑनलाइन तिकिट बूक करणं योग्य आहे. तुम्ही घरी बसून irctc.co.in या संकेतस्थळावर तिकिट बूक करू शकता. तिथून तुम्ही मोबाइलवर अॅप घेऊन त्यावरसुद्धा तिकिट बूक करण्याची सुविधा आहे. 
IRCTC च्या वेबसाइटवर गेल्यानंतर अकाउंट तयार कऱण्यासाठी रजिस्टर बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला युजरनेम, पासवर्ड, भाषा, नाव, जन्मदिनांक, मोबाईल नंबर, ईमेल इत्यादी माहिती द्यावी लागते. माहिती भरल्यानंतर सबमिट करून अकाउंट तयार होतं. 

80 स्पेशल ट्रेनची यादी डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

अकाउंट तयार झाल्यानंतर होमपेजला लॉग इन करून बुक युवर तिकिट पेजवर तुम्हाला कोणत्या ठिकाणाहून प्रवास करायचा आहे ? कोणत्या दिवशी? क्लास यांची निवड करावी लागते. सीट उपलब्ध असतील तर कोणती सीट हेसुद्धा सिलेक्ट करू शकता. त्यानंतर बुक नाऊ वर क्लिक केल्यानंतर प्रवाशांचे नावे द्यावी लागतात.  

कोणाला आणि कसा प्रवास करता येणार?
प्रवाशांना विशेष रेल्वेतून प्रवास करण्यासाठी आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करणं आवश्यक आहे. तसंच प्रवासावेळी कांबळ, चादर, पडदे हे रेल्वेकडून दिले जाणार नाहीत. रेल्वेत चढताना आणि प्रवासावेळी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागेल. रेल्वे स्टेशनवर सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग होईल. कोरोनाची लक्षणे न दिसणाऱ्या प्रवाशांनाच ट्रेनमध्ये प्रवेश दिला जाईल. तसंच मास्क वापरणं बंधनकारक असेल.

हे वाचा - ऑक्सफर्डने थांबवली लशीची ट्रायल; DGCI ने सीरमला पाठवली कारणे दाखवा नोटीस

सध्या विविध रेल्वे मार्गांवर २३० विशेष एक्स्प्रेस ट्रेन्स चालवल्या जात आहेत. ज्यामध्ये ३० राजधानी एक्स्प्रेसचा देखील समावेश आहे. राज्यांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार रेल्वे गाड्या सुरु केल्या जातील. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या स्पेशल ट्रेनबाबत आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाईल. ट्रेन सुरु करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या किंवा मोठी प्रतिक्षा यादी असलेल्या ठिकाणी क्लोन ट्रेन सुरु करण्यात येतील. त्यानंतर कसा प्रतिसाद मिळतो त्यावर नियमितपणे आणखी ट्रेन सुरु केल्या जातील, असंही भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यांनी सांगितलं होतं.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: railwa ticket booking irctc special trains know rules covid 19 pandemic