Railway Fare Hike : रेल्वे प्रवास महागणार! २६ डिसेंबरपासून भाडे वाढणार; देशभरातील लाखो प्रवाशांवर परिणाम

Rail fare increase: भारतीय रेल्वेने या वर्षी रेल्वे तिकिटांच्या किमतीत ही दुसरी वाढ केली आहे.
Railway Fare Hike Effective From 26 December

Railway Fare Hike Effective From 26 December

sakal

Updated on

Railway Fare Hike : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. २६ डिसेंबर २०२५ पासून रेल्वे भाड्यात सुधारणा लागू होतील. या निर्णयाचा देशभरातील लाखो प्रवाशांवर परिणाम होणार आहे. तर, कमी अंतराच्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी, रेल्वेने २१५ किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी भाडे न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, दैनंदिन प्रवाशांच्या हितासाठी, उपनगरीय गाड्या आणि मासिक हंगामी तिकिटांच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

रेल्वे मंत्रालयाच्या मते, नवीन भाडे सुधारणा राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत, तेजस, हमसफर, अमृत भारत, महामना, गतिमान, अंत्योदय, जन शताब्दी, युवा एक्सप्रेस, एसी विस्टाडोम कोच, अनुभूती कोच आणि सामान्य उपनगरीय सेवांसारख्या प्रीमियर आणि विशेष ट्रेन सेवांना देखील लागू होईल.

रेल्वेचा अंदाज आहे की, या भाडे समायोजनामुळे अंदाजे ६०० कोटींचा अतिरिक्त महसूल मिळेल. रेल्वेच्या मते,  ही रक्कम ऑपरेटिंग खर्च भागवण्यासाठी आणि स्टेशन सुविधा, कोच देखभाल आणि सुरक्षा यासारख्या प्रवाशांच्या सुविधा सुधारण्यासाठी वापरली जाईल.

Railway Fare Hike Effective From 26 December
Loha election result : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का! लोहा नगर परिषद निवडणुकीत भाजपचे एकाच कुटुंबातील सहा जण पराभूत!

प्राप्त माहितीनुसार सामान्य श्रेणीत २१५ किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी कोणतेही अतिरिक्त भाडे आकारले जाणार नाही. यामुळे दैनंदिन प्रवाशांवर आणि कमी अंतराच्या प्रवाशांवर भार पडणार नाही. रेल्वेने म्हटले आहे की हा निर्णय सर्वसामान्यांना लक्षात घेऊन घेण्यात आला आहे.

Railway Fare Hike Effective From 26 December
Abu Azmi on Bangladesh Mob Lynching : बांगलादेशात जमावाने हिंदू तरूणास बेदम मारून जाळलं ; संतापजनक घटनेवर अबू आझमींची प्रतिक्रिया, म्हणाले...

याशिवाय रेल्वेने स्पष्ट केले आहे की, २१५ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी, सामान्य वर्गात प्रति किलोमीटर १ पैशाने भाडे वाढेल, तर मेल/एक्सप्रेस आणि एसी वर्गात प्रति किलोमीटर २ पैशांनी भाडे वाढेल.

Railway Fare Hike Effective From 26 December
Epstein Files Missing : अमेरिकेत खळबळ! 'जेफ्री एपस्टाईन'शी संबंधित फाईल्स गायब; २४ तासांत ट्रम्पचा फोटोही डिलीट

भारतीय रेल्वेने या वर्षी रेल्वे तिकिटांच्या किमतीत ही दुसरी वाढ केली आहे. यापूर्वीची वाढ १ जुलै रोजी करण्यात आली होती. १ जुलैपासून भारतीय रेल्वेने रेल्वे भाड्यात केलेली वाढही त्याच प्रमाणात होती. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे भाडे प्रति किलोमीटर १ पैशाने वाढवण्यात आले, तर एसी गाड्यांचे भाडे प्रति किलोमीटर २ पैशाने वाढवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com