

CAG Report Flags Unsafe Drinking Water at Railway Stations
esakal
नवी दिल्ली : रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेसह मूलभूत सुविधांबाबत नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अर्थात कॅगच्या अहवालातून गंभीर बाबी समोर आल्या आहेत. १२ ऑगस्ट रोजी संसदेत सादर करण्यात आलेल्या या अहवालात देशातील ५१२ रेल्वे स्थानकांवरील प्रवासी सुविधा आणि स्वच्छतेची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अनेक स्थानकांवर पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेत त्रुटी आढळल्या आहेत.