esakal | Indian Railway चा मोठा निर्णय; विना मास्क आढळल्यास होणार दंड
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय रेल्वे

Indian Railway चा मोठा निर्णय; विना मास्क आढळल्यास होणार दंड

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सातत्याने विविध पावले उचलली जात आहेत. परंतु, सध्यातरी त्याला म्हणावे तसे यश मिळताना दिसत नाही. दरम्यान, भारतीय रेल्वेने देशातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांनी मास्क घालावा यासाठी कडक पाऊल उचलले आहे. रेल्वे स्टेशनवर मास्क घालण्यासाठी विशेष नियमावली जारी करण्यात आली आहे. रेल्वे परिसर अथवा रेल्वेत असताना मास्क न घातल्यास 500 रुपयांचा दंड होऊ शकतो. त्याचबरोबर रेल्वे स्थानक परिसर अथवा रेल्वेत थुंकून परिसर अस्वच्छ केल्यासही 500 रुपये दंड भरावा लागणार आहे.

विना मास्क स्टेशन परिसरात किंवा रेल्वेत फिरणे अथवा कुठेही थुंकण्यामुळे स्टेशन परिसरात अस्वच्छता पसरेल. त्यामुळे लोकांना विविध आजारांची लागण होऊ शकते, असे रेल्वेचे म्हणणे आहे. त्याचबरोबर कोरोना काळात स्वच्छता न राखल्यास कोरोनाचा संसर्गही होऊ शकतो.

रेल्वे मंत्रालयाने सर्व झोनच्या सर व्यवस्थापकांना पत्र लिहून भारतीय रेल्वे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांचे पालन करण्यासाठी प्रभावी पद्धतीने पाऊल उचलत असल्याचे सांगितले. त्या अंतर्गत विना मास्क स्टेशन परिसर किंवा रेल्वेत प्रवास करताना दिसल्यास त्याच्यावर सक्तीने कारवाई केली जाईल. मास्क न घालणाऱ्यांकडून 500 रुपयेही वसूल केले जातील.

हेही वाचा: रेल्वेसेवा बंद होणार? रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष काय म्हणाले

कोरोनाचा संसर्ग पाहता रेल्वे प्रशासना प्रवाशांकडून सक्तीने कोविड प्रोटोकॉलचे पालन करुन घेत आहे. यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना रेल्वे, प्लॅटफॉर्म आणि स्टेशन परिसरात निगराणीसाठी तैनात केले आहे. हे जवान प्रवाशांकडून कोविड-19 नियमावलीचे पालन होतेय की नाही यावर लक्ष ठेवतील. त्याचबरोबर यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही मदत घेतली जाणार आहे.

हेही वाचा: देशाला मंगळवारपासून भासणार हजारो टन ऑक्सिजनची गरज