Raj Thackeray
Raj Thackerayesakal

Bharat Ratna: राज ठाकरेंनी उल्लेख केलेले दापोलीचे ३ भारतरत्न कोण ?

आजच्या जाहिर सभेत राज ठाकरेंनी ज्या भारतरत्नांचा उल्लेख केला त्यांचा इतिहास जाणून घेऊया.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून शस्त्रक्रिया झाल्याने घरीच विश्रांती घेत होते. दोन-तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर अखेर राज ठाकरेंनी आज पहिली जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी दापोलीच्या भारतरत्नांची आठवण काढली. दापोलीला भारतरत्नांची भूमी असं म्हटलं जातं. आजच्या सभेत राज ठाकरेंनी गर्वाने ज्या भारतरत्नांची नावं घेतली जाणून घेऊया त्यांच्या कामगिरीबद्दल. (Raj Thackeray speech on Bharat Ratna from dapoli)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष आणि दीन-दलित-वंचितांचे कैवारी म्हणून ओळखळे जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा परिचय जगभऱ्यात कोणाला वेगळा द्यायची गरज नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महू इथं झाला; पण त्यांचं मूळ गाव आंबवडे हे दापोली तालुक्यातलंच. त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना भारतरत्न हा मानाचा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या कार्याची किर्ती आजही अजरामर आहे.

पां. वा. काणे

पां. वा. काणे यांचा जन्म 7 मे 1880 मध्ये चिपळूणमधल्या पेढे परशुराम इथं झाला. दापोलीत त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते मुंबईला गेले. संस्कृत, धर्मशास्त्र, भारतीय विद्या (म्हणजे इंडोलॉजी), हिंदू तसंच मुस्लीम कायदा, याबरोबरच फ्रेंच आणि जर्मन भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते.

लोकमान्य टिळक

समाजसुधारक लोकमान्य टिळकांचा जन्म जरी रत्नागिरीतला, तरी त्यांचं मूळ गाव दापोली तालुक्यातलं चिखलगाव. त्यांच्या मूळ वास्तूच्या ठिकाणी आज स्मारकाच्या स्वरूपात लोकमान्यांचा पुतळा उभा आहे. त्यांचं लग्नही याच गावात झाल्याचे संदर्भ सापडतात. कारण त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई यांचं गावही जवळचंच लाडघर. तिथल्या बाळ घराण्यातल्या माहेरच्या त्यांच्या आठवणीही सांगण्यात येतात.

Raj Thackeray
Raj Thackeray: 'सेना सोडताना बाळासाहेबांनी...'; राज ठाकरेंची आजवर गुपित असलेली आठवण

बऱ्याच दिवसानंतर स्वत:च्या मनातील बऱ्याच गोष्टी आजच्या जाहिर सभेच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी नागरिकांपुढे मांडल्या. त्यामित्ताने दापोलीच्या भारतरत्नांचा इतिहासाची पुन्हा एकदा नव्याने सगळ्यांना आठवण झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com