अमित शहा, Mind it! हिंदीची जबरदस्ती खपवून घेणार नाही... : रजनीकांत

Rajanikanth reacts on one nation one language
Rajanikanth reacts on one nation one language

तमिळनाडू : 'कोणावरही हिंदी भाषा लादली जाऊ नये. एक देश एक भाषा ही संकल्पना ठीक आहे, पण सगळ्यावर हिंदी भाषा लादली जाणे हे स्विकारले जाणार नाही,' असे वक्तव्य दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतने केले आहे. अमित शहांच्या 'वन नेशन वन लँग्वेज' या संकल्पनेवर बोलताना रजनीकांतने ही संकल्पना स्विकारली जाणार नाही असा इशारा दिला आहे.

हिंदी भाषादिवसानिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी 'वन नेशन वन लँग्वेज'चा मुद्दा उपस्थित केला होता. 'केवळ तमिळनाडूच नाही, तर दक्षिणेतील कोणतेच राज्य हिंदीचा दबाव स्विकारणार नाहीत. फक्त हिंदीच नव्हे, तर कोणत्याच भाषेची जबरदस्ती करू नये. एका देशात एक भाषा ही संकल्पना ठिक आहे, मात्र प्रत्यक्षात हिंदी भाषेचा हा आग्रह स्विकारला जाणार नाही,' अशा कडक शब्दांत रजनीकांतने सरकारला सुनावले आहे. 

‘वन नेशन वन टॅक्स’, ‘वन नेशन वन पॉवर ग्रीड’, ‘वन नेशन वन इलेक्शन’नंतर भाजपने ‘वन नेशन वन लँग्वेज’चा मानस बोलून दाखवला होता. याला निमित्त हिंदी भाषा दिन ठरला होतं. भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘वन नेशन वन लँग्वेज’चा मुद्दा उपस्थित केला होता.

‘वन नेशन वन लँग्वेज’चा स्वीकार होणार?
दरम्यान, हिंदी भाषा दिवसाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक ट्विट केले होते. त्यात ‘वन नेशन वन लँग्वेज’चा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. अमित शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारत विविध भाषांचा देश आहे. त्यातील प्रत्येक भाषेला त्याचे त्याचे एक वेगळे महत्त्व आहे. पण, देशाची एकच भाषा असणे, अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे जगात आपली वेगळी ओळख निर्माण होईल. आज, देशाला एकत्र बांधण्याचे काम कोणती भाषा करत असले तर ती हिंदी आहे. अर्थातच ती सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. आपल्या देशात उत्तर भारतात हिंदी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असली तरी, दक्षिणेतील राज्यांनी हिंदीला स्वीकारलेले नाही. तसेच पूर्वेकडील राज्यांमध्ये कामकाजासाठी त्या त्या राज्यांची भाषाच वापरली जाते. ‘वन नेशन वन लँग्वेज’ ही राज्ये स्वीकारणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com