Rajasthan Assembly Elections : विद्यार्थ्यांना लॅपटॉप, पंधरा लाखांचा विमा; काँग्रेसकडून पाच हमी योजना : जुनी पेन्शन योजना कायम ठेवणार

निवडणुकीच्या अगोदर दहा सरकारी योजनांचा लाभ प्रत्येक कुटुंबाला देण्याची हमी काँग्रेसने
election
electionsakal

जयपूर - राजस्थानची निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने कर्नाटकप्रमाणेच पाच हमी योजना जाहीर केल्या आहेत. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री अशोक गेहलेात यांनी निवडणूक जाहीरनामा जाहीर केला. जुनी पेन्शन योजना कायम ठेवणे, सरकारी महाविद्यालयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप, शेण आणि गोमूत्र खरेदी यासारख्या योजनांचा समावेश आहे. आपत्ती निवारण निधी योजनेनुसार पंधरा लाखांचा विमा, इंग्रजी माध्यम शिक्षण यासारख्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

निवडणुकीच्या अगोदर दहा सरकारी योजनांचा लाभ प्रत्येक कुटुंबाला देण्याची हमी काँग्रेसने दिली होती. दोन दिवसांपूर्वीच झुंझुनू येथील काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या सभेत गेहलोत यांनी दोन हमी जाहीर केल्या होत्या. त्यात एक कोटीपेक्षा अधिक कुटुंबांना पाचशे रुपयांत गॅस सिलिंडर आणि प्रत्येक कुटुंबातील प्रमुख महिलेस वार्षिक दहा हजार रुपये देण्याची हमी होती. आता काँग्रेसने आज आणखी पाच हमी दिल्या आहेत. राजस्थानमध्ये कॉग्रेस पुन्हा सत्तेत आले तर पाच हमी योजनांचा लाभ प्रत्येक कुटुंबाला मिळेल, असे गेहलोत म्हणाले.

गोधन हमी : सत्तेत आल्यानंतर गोधन योजना लागू केली जाईल. यानुसार शेणाची दोन रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केली जाईल. सध्या ही योजना छत्तीसगडमध्ये लागू आहे. या योजनेमुळे राज्यातील शेतकरी वर्ग थेट काँग्रेसशी जोडला जाणार आहे. लॅपटॉप-टॅबलेट हमी: उच्च शिक्षणासाठी काँग्रेसने प्रत्येक विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप आणि टॅबलेट देण्याची हमी दिली आहे. या योजनेच्या नियमानुसार एखादा विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेत असेल तर त्याला पहिल्या वर्षी लॅपटॉप,टॅबलेट मोफत दिले जाईल. जेणेकरून त्याच्या शिक्षणात अडथळा येणार नाही.

आपत्ती निवारण दिलासा हमी: या हमी योजनेनुसार नैसर्गिक आपत्तीच्या स्थितीत प्रत्येक कुटुंबाला पंधरा लाखांपर्यंतचा मोफत विमा उपलब्ध करून दिला जाणार आहे.इंग्रजी माध्यम शिक्षण : सरकारने राज्यात तीन हजारांहून अधिक इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू केल्या आहेत. पण काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची हमी राहील

election
Grampanchayat Election: बावडा येथे सरपंचपदासाठी तिरंगी लढत

जुनी पेन्शन योजना : राज्यात सध्या जुनी पेन्शन योजना लागू आहे. ती सक्रिय ठेवण्याचे आश्‍वासन दिले आहे. काँग्रेसची सत्ता स्थापन होत असेल तर राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना कायम राहील. ही योजना गेल्यावर्षी राजस्थानने लागू केली आणि ते देशातील पहिले राज्य ठरले हेाते.

election
Rajasthan Election: निवडणुकीआधी मुलामुळे अशोक गेहलोतांचं टेंशन वाढणार; 12 वर्षांपूर्वीचं प्रकरण काय?

ईडीच्या कारवाईवर गेहलोत भडकले

राजस्थान प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षाच्या निवासस्थानी छापा घातल्याने आणि मुलाला समन्स बजावल्याने संतप्त झालेले मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘‘एका राज्याच्या मुख्यमंत्र्यास खेदाने म्हणावे लागते, देशातील रस्त्यावर श्‍वानांपेक्षा ईडीवाले फिरत आहेत. आपण ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडे वेळ मागितला. परंतु पण या संस्था आता राजकीय हत्यार ठरल्या आहेत. भाजपचे काऊंटडाऊन सुरू झाले असून हे मोदी यांच्या लक्षात येत नाहीय. ते आमच्या गॅरंटी मॉडेलचे अनुकरण करत आहेत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com