Rajasthan News
esakal
पंचायत समितीची निवडणूक पत्नी हरल्यानंतर भाजप आमदाराच्या खासगी सहाय्यकाने एका गावातील तब्बल ५० स्ट्रीट लाईट काढून घेतल्याचा आरोप होत आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या तीन तासांत ही कारवाई झाल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या घटनेमुळे स्थानिक राजकारणातही चर्चा सुरू झाली आहे. राजस्थानमधील टोंक जिल्ह्यात हा प्रकार घडला.