esakal | 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी रेड झोनमध्ये दिली मोठी सूट; टॅक्सी, उद्याने, तंबाखू विक्रीला परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

rajasthan chief minister ashok gehlot gave big relief in lockdown-4

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी लॉकडाऊन-4 मधून जनतेला मोठी सूट दिली आहे. मंगळवारपासून राज्यातील रेड झोनमध्ये टॅक्सी आणि ऑटोरिक्षा चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत उद्यानेदेखील उघडे ठेवण्यात येणार आहेत.

'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी रेड झोनमध्ये दिली मोठी सूट; टॅक्सी, उद्याने, तंबाखू विक्रीला परवानगी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जयपूर - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी लॉकडाऊन-4 मधून जनतेला मोठी सूट दिली आहे. मंगळवारपासून राज्यातील रेड झोनमध्ये टॅक्सी आणि ऑटोरिक्षा चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत उद्यानेदेखील उघडे ठेवण्यात येणार आहेत. मात्र, उद्यानात व्यायामशाळा किंवा मंदीर असेल तर ते बंद ठेवण्यात येणार आहेत. शिवाय पाचपेक्षा अधिक लोक एकत्र फिरण्यावर बंदी घातली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पान-तंबाखू विक्रीलाही परवानगी देण्यात आली आहे. पण, तंबाखूचे सेवन सार्वजनिक जागी करता येणार नाही.  गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव स्वरुप यांनी सोमवारी रात्री उशिरा याबाबत आदेश जारी केला आहे. टॅक्सी किंवा ऑटो सेवा रेल्वे स्टेशन, विमानतळ, बस स्थानक, रुग्णालय ते घर आणि घरापासून रेल्वे स्टेशन, विमानतळ, बसस्थानक, रुग्णालय अशी देता येणार आहे. विमानतळावर विमानतळ अधिकाऱ्यांच्या परवानगीने टॅक्सी किंवा ऑटो, तसेच रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावर स्थानिक पोलिसांच्या परवानगीने टॅक्सी किंवा ऑटो चालतील. टॅक्सीमध्ये चालक अधिक दोन प्रवासी आणि ऑटोमध्ये चालक अधिक एक प्रवासी अशी सेवा देता येणार आहे.
----------
भाजपमध्ये धूसफूस; मागील महिन्याच्या राजकारणाचा पहिला बळी
----------
अभिमानास्पद ! युएनचा मिलिट्री जेंडर अ‍ॅडव्होकेट पुरस्कार मेजर सुमन गावनी यांना जाहीर
----------
राजस्थानमध्ये कोरोना बाधितांची संख्या 7376 वर जाऊन पोहोचली आहे. सोमवारी 75 नवे कोरोना बाधित सापडले आहेत. कोरोना बाधितांचा आकडा राजस्थानमध्ये वाढत आहे. जोथपूरमध्ये आतापर्यंत 1200 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे, तर 867 कोरोना बाधितांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना महामारीवर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे मधुमेह, ब्लड प्रेशर अशा आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनीही कोरोनावर मात केली आहे.

कारागृहातील कैद्यांच्या प्रवेशावरही बंदी आणण्यात आली आहे. नव्या कैद्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तरच त्यांना कारागृहात प्रवेश दिला जात आहे. शिवाय नव्या कैद्यांच्या राहण्यासाठी अलवर येथील लॉर्ड कॉलेज तात्परुत्या कारागृहामध्ये रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे जेथे विद्यार्थी शिकत होते तिथे आता कैदी राहणार आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ग्रीन झोन रेड झोनमध्ये बदलले आहेत. मात्र, अशोक गेहलोत यांनी रेड झोनमध्येही मोठी सूट देऊ केली आहे. त्यांच्या या कृतीचे देशातील इतर राज्य सरकारे अनुकरण करतात का, हे पाहावं लागेल.