esakal | राजस्थान काँग्रेसचा पेच सुचणार? सचिन पायलट-राहुल गांधी भेटीची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

rajasthan congress crisis sachin pilot to meet rahul gandhi

सचिन पायलट हे काँग्रेसमधील राहुल गांधी गटाचे विश्वासू नेते मानले जात होते. काँग्रेसचा युवा चेहरा म्हणून त्यांचा उल्लेख केला जात होता. 

राजस्थान काँग्रेसचा पेच सुचणार? सचिन पायलट-राहुल गांधी भेटीची शक्यता

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

जयपूर (Rajasthan Congress):राजस्थानातील काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट (Sachin Pilot) गेल्या काही दिवसांपासून बॅकफूटवर आल्याचे दिसत आहे. काँग्रेसमधून आमदारांनी अपेक्षित पाठिंबा न दिल्यानं सचिन पायलट यांचं बंड फसलंय. आता सचिन पायलट यांनी पुन्हा काँग्रेसशी जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. पायलट गटातून मात्र, जुळवाजूळव करण्याचे वृत्त फेटाळून लावण्यात आलंय. अशोक गेहलोत यांची पदावरून हकालपट्टी करण्याच्या मागणीवर पायलट गट ठाम असल्याचं सांगतिलं जातंय.

देशभरातील इतर घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राहुल गांधीची घेणार भेट
सचिन पायलट यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सचिन पायलट सुरुवातीपासूनच राहुल गांधी यांच्या गटातील नेते मानले जात होते. पण, राजस्थान काँग्रेसमधील तिढा वाढत गेल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्येही दुरावा निर्माण झाला आहे. बंडखोरीची चिन्हं दिसू लागल्यानंतर प्रियंका गांधी आणि सचिन पायलट यांच्यात थोडा फार संवाद झाल्याची माहिती मिळाली होती. परंतु, नंतर पक्ष श्रेष्ठींनी पायलट यांना उपमुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हटविले. बंड फसल्यामुळं पायलट पुन्हा माघारी येण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

आणखी वाचा - राम मंदिराची वजनदार घंटा तयार करायला लागणार 4 महिने

हायकमांडचीच इच्छा
सचिन पायलट हे काँग्रेसमधील राहुल गांधी गटाचे विश्वासू नेते मानले जात होते. काँग्रेसचा युवा चेहरा म्हणून त्यांचा उल्लेख केला जात होता. मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळं पायलटही तसेच बंड करतील, अशी शक्यता होती. परंतु, पायलट यांनी सुरुवातीपासून आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. आता काँग्रेस हायकमांडच पायलट यांना पुन्हा पक्षात आणण्याच्याप्रयत्नात असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच सचिना पायलट आणि राहुल गांधी यांची भेट घडवून आणण्यात येत आहे. मध्यंतरी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सचिन पायलट यांनी हायकमांडची माफी मागावी, असं सांगून पक्षाचे दरवाजे त्यांच्याासाठी खुले असल्याचे संकेत दिले होते. 

आणखी वाचा - रशियाच्या कोरोना लसी विषयी संशय; जागतिक आरोग्य संघटनेची धक्कादायक माहिती

काय आहे परिस्थिती?
सचिन पायलट यांच्या गटात सुरुवातीला 40 आमदार असल्याची चर्चा होती. परंतु, त्यांच्या बंडखोर गटातील आकडा जेमतेम 19पर्यंत जाऊ शकला. सध्या पायलट गटातील हे आमदार हरियाणात गुरुग्राम येथील एका हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती आहे. तर, गेहलोट गटालाही त्यांचे आमदार फुटण्याची भीती आहे. त्यामुळं गेहलोत यांच्या गटातील काँग्रेस आमदार सध्या जैसलमेरमध्ये आहेत. 

Created by Raviraj Gaikwad