
सर्वसामान्यांच्या वीजबिलात शे-पाचशे रुपयांमध्ये येणाऱ्या बिलात एखादा आकडा वाढला तरी हृदयाचे ठोक्यांचा वेग वाढेल. आताही एका ग्राहकाला असंच वीजबिल आलं आहे ज्यातले आकडे मोजून डोळे पांढरे होतील.
जयपूर - लॉकडाऊनच्या काळात वीजबीलांचा धक्का महाराष्ट्रातील अनेकांना बसला. यात गरीबापासून श्रीमंत अशा सर्वांचाच समावेश होता. काहींना कोट्यवधींचे बील आले तर काहींना शून्य रुपयांचेही बिल आहे. विज वितरण महामंडाळाच्या लॉकडाऊनमधील या कारभारामुळे मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागला.
वीजबिल जास्तीजास्त किती येईल. हजार, लाख किंवा फारतर कोटीत. सर्वसामान्यांच्या वीजबिलात शे-पाचशे रुपयांमध्ये येणाऱ्या बिलात एखादा आकडा वाढला तरी हृदयाचे ठोक्यांचा वेग वाढेल. आताही एका ग्राहकाला असंच वीजबिल आलं आहे ज्यातले आकडे मोजून डोळे पांढरे होतील. लाख किंवा कोटींमध्ये नाही तर थेट अब्ज रुपयांचं हे बिल पाहून विजेच्या धक्क्यापेक्षा मोठा झटका ग्राहकला बसला नाही तर नवलच.
हे वाचा - भारतीय रेस्टॉरंटच्या मालकाने अंतराळात पाठवला समोसा; VIDEO VIRAL
राजस्थानमधील एका कंपनीला नेहमीचं लाइट बिल हे 10 ते 20 हजार रुपयांच्या आसपास येतं. मात्र यावेळी आलेल्या बिलाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. वीज देयकाच्या रकमेच्या चौकोनात 3114154015 हा आकडा पाहून कंपनीच्या संचालकांना मोठा धक्का बसला. आकडा पाहिल्यावर तो नेमका किती हेच कळायला वेळ जाईल. बरं हे बिल भरण्यासाठीची मुदती फक्त 25 जानेवारीपर्यंत दिली आहे. जर हे बिल भरलं नाही तर यावर 5 कोटी 75 लाख रुपयांचा दंड आकारण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे.
हे वाचा - सेल्फीने घेतला जीव! दुसऱ्याचा धक्का लागून नदीत कोसळली तरुणी; VIDEO VIRAL
भिलवाडामधील डिझेल पॉवर इंटरनॅशनल कंपनीला गेल्या महिन्यात थोडंथोडकं नाही तर तब्बल 3 अब्ज 11 कोटी 41 लाख 54 हजार रुपयांचं बिल पाठवण्यात आलं आहे. हे बिल पाहताच कंपनीच्या संचालकांना धक्का बसला आहे. त्यानंतर संचालकांनी वीज वितरण कंपनीशी संपर्क साधला. त्यावेळी कॉम्प्युटरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे असं झाल्याचं त्यांनी सांगितलं. अखेर नवीन बिल कंपनीला पाठवण्यात आलं. त्यामध्येही 2 लाखांचा आकडा होता. वीज कंपनीच्या या कारभारावर संचालकांनी प्रश्न उपस्थित केले.