Rajasthan Jalore Murder:
Rajasthan Jalore Murder:sakal

Crime News: वादातून केला शिरच्छेद अन् अख्ख्या जिल्हयातील इंटरनेट गायब, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Published on

Rajasthan Jalore Murder: राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील अहोरे पडर्ली गावात 22 वर्षीय तरुणाचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात २४ तास इंटरनेट बंद करण्यात आले आहे. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मृत व आरोपी एकाच गावातील आहेत

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास ही घटना घडली. आरोपींनी आधी तरुणावर कुऱ्हाडीने मागून वार केले, त्यामुळे तो तरुण खाली पडला.

त्यानंतर आरोपींने मानेवर कुऱ्हाडीचे घाव घालत त्या तरुणाचं डोकं शरीरा वेगळं केल. नंतर डोके घेवून रस्त्यावर फेकले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Rajasthan Jalore Murder:
Maharashtra Road Accident : रस्ते अपघातातील मृत्यूचं प्रमाण ९ टक्के घटलं; शासनाकडे सर्व जिल्ह्यांची आकडेवारी

आरोपी संकलाराम हा इलेक्ट्रॉनिक रिपेअरिंगचे काम करतो आणि त्याची पत्नी भाजी विकते. हत्येमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीत.

मात्र या दोघांमध्ये जुने वैमनस्य असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी आरोपीचे कुटुंबीय फरार आहेत.

Rajasthan Jalore Murder:
Maharashtra Politics : पवारांचा आदेश अन् ठाकरे गट दोन पावले मागे ! लोकसभेच्या जागा वाटपाचा मविआ फॉर्म्युला

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत किशोर सिंह संध्याकाळी फिरायला बस स्टँडकडे जात होता. आरोपी संकलाराम भिल हा त्याच्या घराजवळ बांधलेल्या मंदिरावर बसला होता.

किशोर सिंह येताना पाहून संकलारामने दुचाकी घेतली आणि किशोर सिंहच्या मागे थांबवली, त्यानंतर किशोर सिंह यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला, त्यामुळे किशोर सिंह जमिनीवर पडला. यानंतर आरोपीने गळ्यावर वार करत धडापासून डोके केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com