होय, आम्ही गांधी-नेहरू घराण्याचे गुलाम आहोत : आमदार संयम लोढा

Gandhi-Nehru Family
Gandhi-Nehru Familyesakal
Summary

'जोपर्यंत आमच्या शरीरात दम आहे, तोपर्यंत आम्ही गांधी-नेहरू घराण्याची गुलामगिरी करू.'

राजस्थान विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Rajasthan Budget Session) सिरोहीचे आमदार संयम लोढा (MLA Sanyam Lodha) आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचे सल्लागार पुन्हा एकदा चर्चेत आलेत. लोढा हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमी चर्चेत असतात. काल विधानसभेच्या अधिवेशनात संयम लोढा यांनी स्वतःला आणि काँग्रेसच्या सर्व नेत्यांना गांधी-नेहरू घराण्याचं (Gandhi-Nehru Family) 'गुलाम' म्हंटलंय.

विधानसभेत हरिदेव जोशी पत्रकारिता आणि जनसंवाद विद्यापीठ (Haridev Joshi University of Journalism and Mass Communication) दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान संयम लोढा म्हणाले, आम्ही गांधी-नेहरू घराण्याचे गुलाम आहोत. जोपर्यंत आमच्या शरीरात दम आहे, तोपर्यंत आम्ही गांधी-नेहरू घराण्याची गुलामगिरी करू. कारण, हा देश गांधी-नेहरू कुटुंबानं उभारलाय, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.

Gandhi-Nehru Family
भगतसिंग यांच्या बलिदान दिनी सरकारी सुट्टी जाहीर; मुख्यमंत्र्यांची घोषणा

संयम लोढा असं म्हणताच विरोधी पक्ष उपनेते राजेंद्र राठोड यांनी यावर आक्षेप घेतलाय. ते म्हणाले, अरे गुलामांनो.. तुम्ही समाजात काय संदेश पोहोचवणार आहात? गुलामाला बोलता येत नाही, हे त्यांनी स्वतः हून कबूल केलंय, अशी टीका राठोड यांनी केलीय. भाजपचे (BJP) विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया (Gulabchand Kataria) म्हणाले, एखाद्या व्यक्तीची गुलामगिरी हा स्वाभिमान नाहीय आणि तो स्वीकारलाही जाऊ शकत नाही. असं वक्तृत्व म्हणजे अधोगतीचं लक्षण आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Gandhi-Nehru Family
सत्ता मिळाल्यानंतर समान नागरी कायदा लागू करणार : पुष्कर धामी

माजी शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी म्हणाले, काँग्रेसचे आमदार संयम लोढा यांनी ज्या पद्धतीनं सभागृहात सांगितलं की, मी आणि काँग्रेसचे सर्व नेते (Congress) नेहरू-गांधी घराण्याचे गुलाम आहोत. ही गुलामगिरी काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळापासून चालत आलीय. इंग्रजांच्या काळापासून ते गुलामगिरी करत आहेत, तरीही त्यांच्यात सुधारणा झालेली नाहीय, असा टोला त्यांनी लोढा यांना लगावला. दरम्यान, विधानसभेत हरिदेव जोशी पत्रकारिता विद्यापीठ सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान सभागृहात प्रचंड गदारोळ उडाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com