
काँग्रेस आमदार बाजवा यांनी विधानसभेत महाराणा रणजित सिंह यांचा पुतळा बसवण्याचा प्रस्ताव मांडलाय.
भगतसिंग यांच्या बलिदान दिनी सरकारी सुट्टी जाहीर; मुख्यमंत्र्यांची घोषणा
पंजाब विधानसभेत (Punjab Assembly) शहीद-ए-आझम भगतसिंग (Bhagat Singh) आणि संविधान निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे पुतळे बसवण्यात येणार आहेत. याशिवाय, भगतसिंग यांच्या बलिदान दिनीही सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आलीय. याबाबतची नुकतीच घोषणा पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांनी विधानसभेत केलीय. मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव सभागृहात मांडला, तो तत्काळ मंजूर झाला आहे. त्यानुसार 23 मार्चला शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदान दिनी सरकारी सुट्टी असेल, असं त्यांनी जाहीर केलीय.
दरम्यान, काँग्रेस आमदार प्रताप बाजवा (Pratap Bajwa) यांनी विधानसभेत महाराणा रणजित सिंह यांचा पुतळा बसवण्याचा प्रस्ताव मांडला. रणजित सिंहांना आधुनिक पंजाबचे शिल्पकार मानले जाते. पाकिस्तानातील (Pakistan) लाहोरमध्येही त्यांचा पुतळा बसवण्यात आलाय. यापूर्वी भगवंत मान यांनी 23 मार्च रोजी भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. याद्वारे कोणतीही व्यक्ती लाचखोरीची किंवा कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराची तक्रार थेट व्हॉट्सअॅपवर करेल, असा ऐतिहासिक निर्णय त्यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलाय.
हेही वाचा: रामायण मंदिरासाठी मुस्लिम व्यक्तीनं 2.5 कोटींची जमीन केली 'दान'
इतकंच नाही, तर भगवंत मान यांनी शहीद क्रांतिकारक भगतसिंग यांचं मूळ गाव असलेल्या खटकर कलान इथं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. आम आदमी पार्टी भगतसिंग आणि भीमराव आंबेडकर यांच्याबद्दल सातत्यानं बोलत आहे. विशेष म्हणजे, पंजाब सरकारनं सरकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या फोटोऐवजी भगतसिंग आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्याची घोषणा केलीय.
Web Title: Punjab Cm Bhagwant Mann Declares A Public Holiday On March 23 Bhagat Singh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..