जैसलमेरच्या अमरसागरमधल्या कॅचमेंट एरियामध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी हिंदू विस्थापितांना हटवल्यानंतर त्यांच्यासाठी जिल्हा प्रशासनाने त्यांच्यासाठी जमीन दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयावरुन देशभरातून वादंग उठला होता. पण आता प्रशासनाने या हिंदूंची सोय केली आहे.
जिल्हा मुख्यालयापासून ५ किलोमीटर अंतरावर मूलसागर जवळ ९२ गुंठे जमीन देण्यात आली आहे. या जागेवर पाकिस्तानी हिंदूंना विस्थापित करण्यात आलं आहे. या परिवारांसाठी वीज आणि पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळपासून जमीन समतल करण्यास सुरुवात झाली आहे. काम सुरू करण्याआधी जागेची पूजाही करण्यात आली. या जमिनीवर २०० च्या आसपास कुटुंबं राहत होती.
जमीन देण्यात आल्यानंतर पाकिस्तानी विस्थापितांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या लोकांनी एकमेकांना मिठाई भरवत आपला आनंद व्यक्त केला, तसंच त्यांनी जिल्हाधिकारी टीना डाबी यांचे आभारही मानले आहे. मंगळवारी सीमांत लोक संघटनेचे अध्यक्ष हिंदू सिंह सोढा यांनी या जागेची पाहणी केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.