esakal | आमदार फोडाफोडी प्रकरणात भाजपचा काँग्रेसवर पलटवार; राहुल गांधींना केलं लक्ष्य
sakal

बोलून बातमी शोधा

 rajasthan political crisis, sambit patra, Rahul Gandhi

फोन टॅपिंगसह राजस्थानमध्ये घडणाऱ्या अन्य घटनांचा तपास हा सीबीआयकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.

आमदार फोडाफोडी प्रकरणात भाजपचा काँग्रेसवर पलटवार; राहुल गांधींना केलं लक्ष्य

sakal_logo
By
सुशांत जाधव

नवी दिल्ली: राजस्थानमधील सरकार पाडण्यासाठी आमदार फोडाफोडीचे राजकारण केल्याचा काँग्रेसने केलेला आरोप भाजपने फेटाळून लावला आहे. ज्या फोन टॅपच्या माध्यमातून काँग्रेसने भाजपवर घणाघात केला होता त्यावरुनच भाजपने काँग्रेसवर पलटवार केलाय. काँग्रेसने बेकायदेशीररित्या फोन टॅपिंग केले असून या सर्व प्रकाराची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रवक्ता आणि खासदार संबित पात्रा यांनी केली आहे. याशिवाय राजस्थानमधील सद्यपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी राष्ट्रपती राजवट का लागू करु नये? याचे उत्तर राहुल गांधी यांनी द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

ट्विटरचे काही कर्मचारीच हॅकर्सला मिळाले? हॅकिंग प्रकरणात ट्विटरनं नेमक काय म्हटले...

भाजपचे प्रवक्ता डॉ. संबित पात्रा म्हणाले की, राजस्थानमध्ये फोन टॅपिंग करताना राज्य सरकारने नियमाचे पालन पालन केले होते का? फोन टॅपिंग अधिकृतपणे करण्यात आले का? सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांसोबत असाच व्यवहार सुरु आहे का? अशा प्रश्नांचा मारा करत फोन टॅपिंगसह राजस्थानमध्ये घडणाऱ्या अन्य घटनांचा तपास हा सीबीआयकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. 2018 मध्ये राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर आले. अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून याठिकाणी काँग्रेस सरकारमध्ये अंतर्गत शीतयुद्ध सुरु आहे, असा दावाही त्यांनी केला. राजस्थामध्ये काँग्रेसचे राजकीय नाट्य सुरु आहे. याठिकाणी जे काही सुरु आहे त्यात खोटेपणा आणि बेकायदेशीर कृत्य याचे मिश्रण काय असते त्याचे चित्र राजस्थानमध्ये सुरु असलेल्या परिस्थितीतून दिसून येते, असेही संबित पात्रा यांनी म्हटले आहे. 

एक नंबर! शेतकऱ्याच्या मुलाला आली अमेरिकेतील विद्यापीठाची ऑफर!

सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यातील अंतर्गत वाद टोकाला पोहचल्यानंतर राजस्थानमधील राजकारणात संघर्षमय वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेस सरकारला शह देण्यासाठी भाजप आमदार फोडाफोडी करण्याचा कट रचत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यासंदर्भात काँग्रेसने काही ऑडिओ क्लिप समोर आणल्या होत्या. या प्रकरणात केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.  राजस्थानमध्ये काँग्रेस आमदारांना कोट्यवधी रुपये देऊन खरेदी करण्याच्या कथित ऑडिओ क्लिपच्या प्रकरणात  केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे नाव जोडल्याप्रकरणी भाजपने जयपूर येथील अशोक नगर पोलिसांत काँग्रेस नेता रणदिप सुरजेवाला यांच्यासह अन्य काही नेत्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. काँग्रेस केंद्रीय मंत्र्यांविरोधात कट रचत आहे, असा आरोप तक्रारदार भाजप प्रवक्ता लक्ष्मीकांत भारद्वाज यांनी केला आहे.