ट्विटरचे काही कर्मचारीच हॅकर्सला मिळाले? हॅकिंग प्रकरणात ट्विटरनं नेमक काय म्हटले...

Twitter reaction,  Bitcoin scam attackers, Twitter employees
Twitter reaction, Bitcoin scam attackers, Twitter employees

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष  बराक ओबामा, मायक्रोसॉफ्टचे  संस्थापक बिल गेट्स यांच्यासह जगभरातील दिग्गज मंडळींचं ट्विटर अकांउट हॅक झाल्याच्या प्रकरणात नेमका काय प्रकार घडला यासंदर्भात ट्विटरकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दिग्गज मंडळींच्या ट्विटर अकाउंट हॅक करत त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन बिटकॉइन या आभासी चलन दुप्पट करुन देण्याची योजनेसंदर्भात ट्विट करण्यात आले होते. ट्विटरने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. हॅकर्संनी सोशल इंजिनियरिंगच्या माध्यमातून ट्विटर कर्मचाऱ्यांना लक्ष केले. ट्विटरच्या अंतर्गत प्रणालीपर्यंत पोहचण्यासाठी हॅकर्संनी कर्मचाऱ्यांच्या डेटाचा वापर केला.

कर्मचाऱ्यांच्या डेटाच्या माध्यमातूनच हॅकर्स ट्विटरच्या टू फॅक्टर सुरक्षा प्रणालीपर्यंत पोहचले. हॅकर्संनी 130 ट्विटर अकाउंट हॅक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सपोर्ट टीममधील टूल्सचा वापर केला. यातील 45 अकाउंट्स पासवर्ड रिसेटसह लॉगिन करुन ट्विट करण्यासाठी हॅकर्संना यश आले, असेही ट्विटरने म्हटले आहे. यापूर्वी देखील ट्विटरने या सर्व प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. ट्विटरचे कार्यकारी अधिकारी जॅक दोरजी यांनी हा दिवस आमच्यासाठी खूप धक्कादायक होता. या भयावह प्रकारासंदर्भातील सर्व माहिती दिली जाईल, असेही त्यांनी म्हटले होते.  

बुधवारी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा, अ‍ॅमेझॉनचे कार्यकारी अधिकारी जेफ बोजोस, प्रसिद्ध व्यावसायिक एलन मस्क, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यासह अन्य काही प्रसिद्ध व्यक्तींची ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. हा सर्व प्रकार बिटकॉइनमधील सर्वात मोठा घोटाळा मानला जात आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com