अधिकाऱ्यानं केलं माजी खासदाराचं कौतुक; केंद्रीय मंत्री भडकले

अधिकाऱ्यानं केलं माजी खासदाराचं कौतुक; केंद्रीय मंत्री भडकले
Summary

माजी खासदाराचं कौतुक करणाऱ्या अधिकाऱ्याला झापताना खासदार चौधरी म्हणाले की, इतकीच हौस आहे तर पक्षात का जात नाही?

जोधपूर - भोपालगढचे उपविभागिय अधिकारी हवाई सिंह यादव यांना माजी खासदाराचं कौतुक करणं महागात पडलं आहे. एसडीएम हवाई सिंह यांनी माजी खासदाराचे कौतुक केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि जोधपूरचे खासदार गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासह पालीचे खासदार पीपी चौधरी यांनी बैठकीतच त्यांची शाळा घेतली. पीपी चौधरी यांनी तर कठोर शब्दात सुनावताना हवाई सिंह यांना म्हटलं की, इतकीच हौस असेल तर पक्षातच का जात नाही. आता दोन्ही खासदारांनी हवाई सिंह यांना सुनावल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पाली लोकसभा मतदारसंघात असलेल्या भोपालगढचे एसडीएम हवाई सिंह यादव यांनी नुकतंच एका कार्यक्रमात माजी खासदार आणि काँग्रेस नेते बद्रीराम जाखड यांचं कौतुक केलं होतं. सध्याच्या खासदारांपेक्षा आधीचे खासदार सक्रीय आहेत. आपले खासदार असेच हवेत असं हवाई सिंह यांनी म्हटलं होतं. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर शनिवारी जोधपूर DPDC च्या बैठकीत केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि खासदार पीपी चौधरी यांनी बैठकीतच एसडीएम हवाई सिंह यांना प्रश्न विचारले.

अधिकाऱ्यानं केलं माजी खासदाराचं कौतुक; केंद्रीय मंत्री भडकले
बापूंच्या खादीला विसरलो, पण गुजरातचे सुपूत्र नरेंद्र मोदींनी... : अमित शाह

बैठक सुरु होताच खासदार पीपी चौधरी यांनी एसडीएम हवाई सिंह यांना प्रश्न विचारयाला सुरुवात केली होती. त्यांना रोखत शेखावत यांनी मधेच बोलणं सुरु केलं. शेखावत म्हणाले की, लोकांमध्ये खासदारांना पासिंग मार्क्स देताय? तरीही नोकरी करत आहात? एका खासदाराबाबत वक्तव्य करण्याचा अधिकार कोणी दिला?

शेखावत यांनी विचारलं की, तुम्ही खासदारांचे हजेरी पुस्तक घेऊन फिरता का? पदावर राहण्यासाठी असे बोलता. सरकार कायम नसतं, हे सरकारसुद्धा बदलेल. तुम्हाला फक्त वीस वर्षे नोकरी करायची आहे. अधिकारी आहात तर संविधानानुसार काम करा, अधिकारी कोणत्या पक्षाचा नसतो.

अधिकाऱ्यानं केलं माजी खासदाराचं कौतुक; केंद्रीय मंत्री भडकले
देशात 75% प्रौढांचे लसीकरण पूर्ण: PM मोदींनी नागरीकांचे केले अभिनंदन

खासादर पीपी चौधरी यांनीही एसडीएम हवाई सिंह यांच्यावर प्रश्नांचा मारा केला. तुम्ही नागरी सेवेला कमी लेखताय. आपली नागरी सेवा अशी नाही. अधिकाऱ्यांची निष्ठा संविधानाप्रती असते आणि त्याची शपथही घेतली जाते. तुमची निष्ठा कोणत्या पक्षासाठी आहे का? इतकीच हौस असेल तर पक्षात का जात नाही? असं म्हणत खासदार चौधरी यांनी अशा लोकांना नोकरीत राहण्याचा अधिकार नाही म्हणत नोकरीवरून हटवण्याची मागणी केली. दरम्यान, एसडीएम हवाई सिंह यांनी घडल्या प्रकाराबद्दल माफीही मागितली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com