इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काही तासांतच राजीव गांधींचा झालेला शपथविधी; नंतर निधनाची औपचारिक घोषणा केलेली

Indira Gandhi Death And Rajiv Gandhi : १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर काँग्रेसमध्ये अनेक दिग्गज आणि वरिष्ठ नेते होते पण राजीव गांधी यांना उत्तराधिकारी घोषित करत पंतप्रधानपदाची शपथ देण्यात आली होती.
Indira Gandhi Death Rajiv Gandhi Oath Taken Before Nation Was Informed

Indira Gandhi Death Rajiv Gandhi Oath Taken Before Nation Was Informed

Esakal

Updated on

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काही तासातच पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. राजीव गांधी यांना राजकारणात रस नव्हता. त्यांनी स्वत:ला राजकारणापासून दूर ठेवलं होतं. पायलट म्हणून ते नोकरी करत होते. पण भाऊ संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर ते राजकारणात आले. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर काँग्रेसमध्ये अनेक दिग्गज आणि वरिष्ठ नेते होते पण राजीव गांधी यांना उत्तराधिकारी घोषित करत पंतप्रधानपदाची शपथ देण्यात आली होती. इंदिरा गांधी यांचा मृत्यू झाला तेव्हा त्या घटनात्मक पदावरती होत्या. घटनात्मक पेचप्रसंग तयार होऊ नये म्हणून लगेचच राजीव गांधींना शपथ दिली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com