भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड होणार नाही; राजनाथ सिंहांचा चीनला अप्रत्यक्ष इशारा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

भारतीय सीमारेषेवर सध्या जे एकूण वातावरण बनले आहे किंवा मी असे म्हणेन की, जे वातावरण जाणीवपूर्वक बनवले गेले आहे ते पाहता राफेल विमानांचा हवाई दलातील समावेश महत्त्वाचा आहे.

अंबाला : "भारतीय हवाई दलात राफेल या फायटर विमानांचा समावेश होणे हा जगासाठी आणि त्यातल्या त्यात आमच्या सार्वभौमत्वावर नजर ठेवणाऱ्यांना एक मोठा आणि कठोर संदेश आहे," असे करारी विधान भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. आपल्या विधानातून एकप्रकारे त्यांनी चीनला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. अंबाला हवाई तळावरील कार्यक्रमात सिंह बोलत होते.

मोठी बातमी : राममंदिराच्या देणगी खात्यावर चोरट्यांनी मारला डल्ला; लाखो रुपये केले लंपास​

ते पुढे म्हणाले की, ''भारतीय सीमारेषेवर सध्या जे एकूण वातावरण बनले आहे किंवा मी असे म्हणेन की, जे वातावरण जाणीवपूर्वक बनवले गेले आहे ते पाहता राफेल विमानांचा हवाई दलातील समावेश महत्त्वाचा आहे. नुकत्याच झालेल्या परदेश दौऱ्यात, मी आपल्या भारताचा दृष्टीकोन संपूर्ण जगासमोर मांडला आहे. कोणत्याही परिस्थितीत भारताच्या सार्वभौमत्वाबाबत आणि प्रादेशिक अखंडतेबाबत आम्ही तडजोड करणार नाही, भारताचा हा निर्धार आहे. आणि याची कल्पना मी दिली आहे. सार्वभौमत्वासाठी आणि देशाच्या अखंडतेसाठी शक्य ते सर्व करण्यास आम्ही सर्वोतोपरी कटीबद्ध आहोत.'' 

देशात 4 मिनिटाला होतेय एक आत्महत्या, कौटुंबिक समस्या प्रमुख कारण​

भारतीय हवाई दलातील राफेल विमानांचा समावेश ही घटना भारत आणि फ्रान्समधील मजबूत संबंध दाखवितात. आणि दोन्ही देशांमधील सामरिक संबंधही यामुळे बळकट झाले आहेत. मी आज भारतीय हवाई दलातील आमच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करू इच्छितो. सीमेवर नुकत्याच झालेल्या दुर्दैवी घटनेदरम्यान, भारतीय हवाई दलाने एलएसीजवळ केलेल्या जलद आणि प्रभावी कारवाईने तुमची वचनबद्धता पुन्हा एकदा दाखवली आहे. भारतीय हवाई दलाने हल्ल्यानंतर त्वरीत ज्या वेगाने आपले सैन्य तैनात केले त्यातून हा आत्मविश्वास निर्माण होतो की, आपले हवाई दल हे आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी पूर्णपणे तयार आणि कटीबद्ध आहे, अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दल आणि सैन्याचे कौतुक केले.

- जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajnath Singh took strong message to World on induction of 5 Rafale Jets