राज्यसभेच्या २६ जागांसाठी २८ उमेदवार मैदानात, भाजपनं वाढवलं काँग्रेसचं टेन्शन; दोन-तृतियांश बहुमतासाठी NDAच्या हालचाली

Rajya Sabha Elections 2026: राज्यसभेत दोन तृतियांश बहुमत गाठण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू आहेत. झारखंड, मध्य प्रदेशात भाजप पुरस्कृत उमेदवारांना मैदानात उतरवल्यानं राज्यसभेच्या निवडणुकीची रंगत वाढली आहे.
Rajya Sabha Elections 2026

Rajya Sabha Poll Battle Intensifies Across States

Esakal

Updated on

Rajya Sabha Elections: देशातील १२ राज्यात राज्यसभेच्या २६ जागांसाठी १८ जूनला निवडणूक होणार आहेय .या २६ जागांमध्ये २४ जागा कार्यकाळ संपल्यानं रिक्त झाल्यात तर २ जागांवर पोटनिवडणूक लागली आहे. २६ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत २८ उमेदवार मैदानत आहेत. राज्यसभेची ही निवडणूक एनडीएसाठी महत्त्वाची आहे. राज्यसभेत दोन तृतियांश बहुमत गाठण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू आहेत. झारखंड, मध्य प्रदेशात भाजप पुरस्कृत उमेदवारांना मैदानात उतरवल्यानं राज्यसभेच्या निवडणुकीची रंगत वाढली आहे. निवडणूक आयोगाने अनेक नेत्यांचा कार्यकाळ संपल्याचं जाहीर केलंय. यात माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांचाही यात समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com