esakal | शरद पवार, उदयनराजे यांना राज्यसभा सदस्यत्व शपथ
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad-Pawar-and-Udayanraje

राज्यसभेत निवडून आलेल्या ४५ नवनिर्वाचित सदस्यांनी अध्यक्ष एम. वेंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत आज सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करीत, पद व गोपनीयतेची शपथ घेतली. गोंधळ टाळून वरिष्ठ सभागृहाची प्रतिष्ठा कायम ठेवावी असे आवाहन उपराष्ट्रपतींनी नव्या खासदारांना केले. अधिवेशन चालू नसताना शपथविधी होण्याचा राज्यसभेच्या इतिहासातील हा विरळा प्रसंग ठरला. कोरोनाच्या संसर्गामुळे दोनदा पुढे ढकलण्यात आलेला हा शपथविधी कार्यक्रम आज झाला.

शरद पवार, उदयनराजे यांना राज्यसभा सदस्यत्व शपथ

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - राज्यसभेत निवडून आलेल्या ४५ नवनिर्वाचित सदस्यांनी अध्यक्ष एम. वेंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत आज सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करीत, पद व गोपनीयतेची शपथ घेतली. गोंधळ टाळून वरिष्ठ सभागृहाची प्रतिष्ठा कायम ठेवावी असे आवाहन उपराष्ट्रपतींनी नव्या खासदारांना केले. अधिवेशन चालू नसताना शपथविधी होण्याचा राज्यसभेच्या इतिहासातील हा विरळा प्रसंग ठरला. कोरोनाच्या संसर्गामुळे दोनदा पुढे ढकलण्यात आलेला हा शपथविधी कार्यक्रम आज झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज शपथ घेणाऱ्यांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, दिग्विजय सिंह, भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे व भुवनेश्‍वर कलिता, शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी आदींचा समावेश होता. नव्याने निवडून आलेल्या ३६ सदस्यांनी आज शपथ घेतली. मराठीसह १० प्रादेशिक भाषांतूनही काही सदस्यांनी शपथ घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेतील कंपन्यांना आवाहन

शिंदे व कलिता यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला. शिंदे यांना १३ महिन्यांनी पुन्हा संसदेत प्रवेश केला आहे. ते भाजपचे खासदार असले तरी शपथविधीनंतर त्यांनी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व दिग्विजयसिंह यांच्यासह काँग्रेसच्या बाकांकडे आवर्जून फेरी मारली. आझाद यांनी प्रेमाने ज्येतिरादित्य यांचे राज्यसभेत स्वागत केले.

भारतात कोरोनाचा उद्रेक वाढतोय; गेल्या 24 तासांत...

शपथ घेतलेले महाराष्ट्रातील सदस्य -

  • भागवत किसनराव कराड (भाजप)
  • उदयनराजे भोसले (भाजप)
  • रामदास आठवले (आरपीआय)
  • प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना)
  • राजीव सातव (काँग्रेस)
  • शरद पवार (राष्ट्रवादी)

Edited By - Prashant Patil