esakal | 'असुदुद्दीन ओवैसी भाजपचे 'चाचाजान', त्यांची टीम एकच'
sakal

बोलून बातमी शोधा

Asaduddin Owaisi

'असुदुद्दीन ओवैसी भाजपचे 'चाचाजान', त्यांची टीम एकच'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लखनौ : काही महिन्यात उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका (UP assebly election 2021) होऊ घातल्या आहेत. त्यानिमित्ताने नेत्यांची एकमेकांवर टीका-टिपण्णी करणे सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'अब्बा जान' म्हणत टीका केली होती, तर आता भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत (Rakesh tikait on owasi) यांनी एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी यांच्यावर टीका केली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपला काहीच अडचण जाणार नाही. कारण त्यांचे 'चाचा जान' आले आहेत. ओवैसी आता भाजपला विजयी करून दम घेतील, असा टोला टिकैत यांनी लगावला. बागपतच्या टटीरी गावात शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा: मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

''सरकारने तिनही कृषी कायदे मागे घ्यावेत आणि एमएसपीची हमी द्यावी यासाठी आम्ही दिल्लीत धरणे आंदोलन करत आहोत. आता MSP मध्ये मोठा घोटाळा होत असल्याचे समोर आले आहे. सरकार, अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या मदतीने धान्य आणि गव्हाच्या शासकीय खरेदीमध्ये प्रति क्विंटल ४०० ते ५०० रुपयांचा फरक आहे. रामपूरमध्ये ११ हजार बनावट शेतकऱ्यांनी हे धान्य खरेदी करून पुढे ते काही व्यापाऱ्यांना विकले आहे, असेही टिकैत म्हणाले. तसेच औवेसी यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, 'ओवैसींवर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही. कारण त्या दोघांची टीम एकच आहे.'

औवेसी १०० उमेदवार देणार -

एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांमध्ये ४०३ पैकी १०० उमदेवार उतरविणार आहेत. यामध्ये काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांनी पक्षामध्ये प्रवेश केल्याची चर्चा होती. त्याबाबत ओवैसी म्हणाले, प्रज्ञा ठाकू या काय दुधाने धुतल्या आहेत का? बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष जदयू, भाजप आणि त्यांच्या घटक पक्षांच्या अनेक आमदारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांना जनतेचे समर्थन आहे, तर आतीक अहमद हा देखील या देशाचा नागरिक आहे. त्याला निवडणूक लढविण्याचा पूर्ण अधिकार आहे, असेही ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री योगींच्या 'अब्बा जान'च्या वक्तव्यावरून त्यांनी 'बाबा' लोकांची दिशाभूल करतोय, असा आरोप केला.

loading image
go to top