Raksha Bandhan 2023 : ७६ वर्षानंतर साजरी होईल 'त्यांची' राखी पौर्णिमा! भारत-पाकिस्तान फाळणीत दुरावलेली भावंड पुन्हा भेटली!  

तिला फक्त एवढंच माहिती होतं की, एक पाठीराखा भाऊ आहे
Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023 esakal

Raksha Bandhan 2023 : १९४७ मध्ये भारत देश इंग्रजांच्या तावडीतून सुटला अन् या देशाचे दोन तुकडे पडले. १४ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचाच भाग असलेला एक तुकडा पाकिस्तान झाला. अन् दुसऱ्याच दिवशी भारताने स्वातंत्र्यावर मोहर लगावली. भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या या फाळणीवेळी अनेक कुटुंब, गावं याचे तुकडे झाले.

अनेक लोक या दोन देशात विभागले गेले. त्या लोकांच्या कथा आजही प्रसिद्ध आहेत. काही लोकांच्या प्रेमकथा, तर काहींनी आपली सख्खी भावंड या फाळणीत गमावली.अशीच एक कथा आज आपण पाहणार आहोत. या फाळणीत विभागलेले बहिण-भाऊ तब्बल ७६ वर्षांनंतर पुन्हा भेटणार आहेत. आणि यंदा ते रक्षाबंधनही साजरी करणार आहेत.  

दोन देशातील फाळणीच्या वेदनांची आणखी एक कहाणी श्री कर्तारपूर साहिब गुरुद्वारामध्ये पाहायला मिळाली आहे. पाकिस्तानातील शेखूपुरा येथे राहणाऱ्या ६८ वर्षीय सकीना यांनी श्री कर्तारपूर साहिब येथे जन्मानंतर प्रथमच आपले ८० वर्षीय बंधू गुरमेल सिंग यांची भेट घेतली आहे. जन्मापासून तिने फक्त आपल्या भावाला फोटोत पाहिलं होतं. पहिल्यांदाच दोघांनी एकमेकांची भेट घेतली अन् अश्रूंना वाट मोकळी करून दिली. (shri kartarpur sahib brother sister meet after partition)

Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023 : आपल्या लाडक्या भावासाठी राखी खरेदी करतांना कोणती काळजी घ्यावी?

पाकिस्तानात जन्मलेल्या सकीनाची ही कहाणी आहे. १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी सकीना यांचे कुटुंब लुधियानातील जसोवाल येथे राहत होते. फाळणीच्या वेळी सकीना यांचे कुटुंब पाकिस्तानात स्थायिक झाले. त्यांच्या वडिलांचे नाव वली मोहम्मद आणि आजोबांचे नाव जामू होते.

सकीना सांगतात की, फाळणीनंतर कुटुंब पाकिस्तानात आले. पण माझी आई भारतातच राहिली. स्वातंत्र्याच्या वेळी दोन्ही देशांमध्ये हरवलेल्या लोकांना एकमेकांना परत करण्याचा करार झाला होता. त्यानंतर वडिलांनी पाकिस्तान सरकारकडे मदत मागितली.

पाकिस्तानी लष्कराचे जवान त्यांच्या आईला घेण्यासाठी जसोवाल गावात पोहोचले. आईला घेण्यासाठी लष्कर पोहोचले तेव्हा 5 वर्षांचा भाऊ घरात नव्हता. आईने भावाला हाक मारली, पण तो आजूबाजूला ही नव्हता. पाकिस्तानी सैन्याने सांगितले की ते अधिक थांबू शकत नाहीत आणि भाऊ भारतातच राहिला. स्वातंत्र्यानंतर माझा जन्म १९५५ मध्ये पाकिस्तानात झाला. (Independence Day 2023)

Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023 : अरे देवा ! यंदा राखी पौर्णिमेचा मुहूर्त रात्री 8 नंतर, जाणून घ्या सविस्तर

सकीना पुढे म्हणाल्या की, सुरुवातीला तिच्या भावाने घरच्यांना पत्र पाठवण्यास सुरुवात केली. मी अडीच वर्षांची असताना माझ्या आईचे निधन झाले. हळूहळू भावाची पत्रे येणे बंद झाले. जेव्हा मला समज आली, तेव्हा वडिलांनी मला सांगितले की, मला एक भाऊही आहे. मी त्यावेळी त्याचा फोटो पहिल्यांदा पाहीला. माझ्या भावाची एकच आठवण त्यावेळी होती. वडील म्हणत असत की, भाऊ लुधियानामध्ये राहतो.

सकीना पुढे म्हणाल्या की, मी मोठी झाल्यावर त्यांनी आपल्या भावाला शोधण्याचा प्रयत्न केले. पण तो अपयशी ठरला. आई-वडिलांच्या निधनानंतर हे एकमेव नातं शिल्लक राहिलं होतं. त्यामुळे भावाला शोधणं हेच त्याचं एकमेव ध्येय होतं.

सकीना यांच्या जावयाने त्यांच्या भावाची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. भारताच्या पंजाबमधील सकीना यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षाच्या अखेरीस सकीना पहिल्यांदा आपल्या भावाशी व्हिडिओ कॉलवर बोलली होत्या. (India Pakistan Partition)

Raksha Bandhan 2023
Rakshabandhan 2023 : यंदा बाजारात खास ‘ईव्हील आय’ राखी! आकर्षण राख्यांनी बाजारपेठ फुलली

यानंतर सकीना आणि त्यांचा भाऊ गुरमेल यांच्या कुटुंबीयांनी श्री कर्तारपूर साहिब येथे भेटण्याचा बेत आखला. गुरमेल पहिल्यांदा आपल्या बहिणीला श्री कर्तारपूर साहिब येथे भेटला. दोघंही मिठी मारून खूप रडले. दोघंही एकमेकांचे डोळे पुसत होते.

आता त्यांना आशा आहे की दोन्ही देशांच्या सरकारांनी त्यांना व्हिसा द्यावा जेणेकरून दोन्ही भाऊ-बहीण एकमेकांसोबत आयुष्याचे काही दिवस घालवू शकतील.

ऑगस्ट २०२२ मध्ये गुरमेल सिंगने आपला पासपोर्ट बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आणि आपल्या बहिणीला भेटण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तब्बल ७६ वर्षांनंतर गुरमेलने आपल्या हक्काच्या कोणालातरी पाहीलं आणि या दोघा भावंडाच्या आनंदाला पारावर उरला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com