esakal | जय श्री राम! पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऐतिहासिक भूमीपूजन सोहळा संपन्न!
sakal

बोलून बातमी शोधा

Ram Mandir, Bhoomi Pujan, PM Modi

हनुमान गढीतील पूजेनंतर मोदी रामलल्लाच्या दर्शनाला रवाना झाले. त्यांनी रामलल्लाची पूजा केली. मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत रंगलेल्या सोहळ्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करत पूजा संपन्न झाली.  RSS सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सीएम योगी आदित्यनाथ देखील पूजेला बसल्याचे पाहायला मिळाले. 

जय श्री राम! पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऐतिहासिक भूमीपूजन सोहळा संपन्न!

sakal_logo
By
सुशांत जाधव

अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजन सोहळा बुधवारी संपन्न झाला. मोदी साकेत महाविद्यालय परिसरात मोदी हॅलिकॉप्टमधून अयोध्या नगरीत दाखल झाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करत मोदींचे स्वागत केले. त्यानंतर मोदींच्या वाहनाचा ताफा थेट हनुमान गढीत पोहचला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  मोदींनी हात सॅनिटायझर करत अयोध्याचा द्वारपाल असलेल्या हनुमानाची पूजा केली. याठिकाणी मोदींना चांदीचा मुकूट आणि हनुमान गदा भेट देण्यात आली. 

अयोध्यापतींचे भव्यदिव्य मंदिर

हनुमान गढीतील पूजेनंतर मोदी रामलल्लाच्या दर्शनाला रवाना झाले. त्यांनी रामलल्लाची पूजा केली. मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत रंगलेल्या सोहळ्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करत पूजा संपन्न झाली.  RSS सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सीएम योगी आदित्यनाथ देखील पूजेला बसल्याचे पाहायला मिळाले. 

राजीव गांधींनी काढलं होतं राम मंदिराचं कुलूप

ऐतिहासिक आणि भव्य-दिव्य अशा राममंदिराच्या  भूमिपूजन समारंभासाठी अयोध्या नगरी सजली होती. शरयू तिर भगव्या रंगाने बहरल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमासाठी देशभरातील धार्मिक स्थळांवरून पवित्र जल आणि मृत्तिका आणण्यात आली होती. मंदिराच्या उभारणीसाठीची अनुष्ठाने आणि अन्य धार्मिक विधींची पूर्तता करत सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येसह लगतच्या भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.