esakal | राम मंदिर भूमीपूजन सोहळा; जाणून घ्या पंतप्रधान मोदींचा दौरा
sakal

बोलून बातमी शोधा

modi ayodhya

कोरोनाचे संकट असताना राम मंदिराच्या भूमी पूजनाचा घाट कशासाठी असा सवालही विरोधकांकडून विचारला जात आहे. दुसरीकडे राम मंदिर जन्मभूमी ट्रस्टने समारंभाची सर्व तयारी सुरू केली आहे. 

राम मंदिर भूमीपूजन सोहळा; जाणून घ्या पंतप्रधान मोदींचा दौरा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लखनऊ - अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाला 5 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. सकाळी अकरा वाजता भूमी पूजनाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. भूमी पूजनासाठी 200 खास व्यक्तींना आमंत्रण दिले जाणार आहे. दरम्यान, सध्या कोरोनाचे संकट असताना राम मंदिराच्या भूमी पूजनाचा घाट  कशासाठी असा सवालही विरोधकांकडून विचारला जात आहे. दुसरीकडे राम मंदिर जन्मभूमी ट्रस्टने समारंभाची सर्व तयारी सुरू केली आहे. मंदिराच्या भूमी पूजनासाठी चांदीची वीटही तयार करण्यात आली असून जवळपास 15 लाख रुपये किंमतीची वीट असल्याचं म्हटलं जात आहे. 

भूमी पूजनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 च्या सुमारास सकेत युनिव्हर्सिटी इथं पोहोचतील. तिथून राम मंदिर कॉम्प्लेक्समध्ये 11.30 वाजता पोहोचतील. त्यानंतर मोदींच्या उपस्थितीत भूमी पुजनाचा कार्यक्रम पार पडेल. या कार्यक्रमासाठी सुरुवातीला 268 पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली होती. ती कमी करून 200 जणांनाच या कार्यक्रमासाठी बोलावण्यात आलं आहे. या पाहुण्यांची प्रत्येकी 50 जणांच्या गटात विभागणी कऱण्यात येईल. यामध्ये संत, राजकीय लोक, राम मंदिरासाठी लढलेले आणि इतर प्रतिनिधी असे गट तयार केले जातील.

हे वाचा - टाइम कॅप्सुल ठेवणार की नाही? राम मंदिर ट्रस्टच्या सदस्यांमध्ये मतभेद

पंतप्रधान मोदींशिवाय भूमी पूजनासाठी माजी उप पंतप्रधान लाल कृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार यांच्यासह दिग्गज उपस्थित राहणार आहेत. राम मंदिराच्या भूमी पूजनाच्या कार्यक्रमाची सर्व व्यवस्था आणि सुरक्षेकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वत:हून लक्ष घालत आहेत.

हे वाचा - भारतात राम मंदिर भूमिपूजनाचा उत्सव, तर पाकिस्तानात 'काळा दिवस'

भूमी पूजन कार्यक्रमानिमित्त अयोध्या शहरातील 12 द्वार सजवण्यात आलेली आहेत. तसंच शहरामध्ये मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या असून त्यावरून भूमी पूजनाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस शहर स्वच्छ करण्यासाठी 4000 कर्मचारी नेमण्यात आले आहेत.