

Ram Mandir Donation Row
Esakal
अयोध्येत राम मंदिरात भाविकांनी दान केलेल्या कोट्यवधींच्या रोकड आणि दागिन्यांमध्ये घोटाळ्याची सध्या चर्चा सुरू आहे. देशातील सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्यांपैकी हा एक असल्याचंही म्हटलं जात आहे. दरम्यान, श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या स्थापनेनंतर काही महिन्यातच नोव्हेंबर २०२० मध्ये एका खासगी ऑडिट कंपनीने व्यवस्थापनावर ताशेरे ओढल्याचा अहवाल दिला होता अशी माहिती समोर येत आहे. व्यवस्थापन अव्यावसायिक असून इथं येणारं दान आणि त्याचा हिशोब व्यवस्थित ठेवला जात नसल्याचं अहवालात म्हटलं होतं. Ram Temple Records Controversy Sparks Fresh Debate