कसे असेल अयोध्येतील राम मंदिर? लवकरच समोर येणार आराखडा

टीम ई-सकाळ
Saturday, 6 June 2020

अयोध्येत राम मंदिर होणार हे पक्के झाल्यानंतर आता हे मंदिर कसे असणार याची चर्चा सुरु आहे. पुढील आठवड्यात राम मंदिराचा आराखडा समोर येण्याची शक्यता आहे.

अयोध्या : राम मंदिर उभारणीच्या प्रदीर्घ काळ चिघळलेल्या मुद्द्यावर मागील वर्षात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाद्वारे सामंजस्यपूर्ण तोडगा काढण्यात आला आहे. राम मंदिर उभारणीच्या बाजूने 9 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याने रामजन्मभूमी- बाबरी मशीद खटल्यातील कायदेशीर लढाईचा शेवट झाला. अयोध्येत राम मंदिर होणार हे पक्के झाल्यानंतर आता हे मंदिर कसे असणार याची चर्चा सुरु आहे. पुढील आठवड्यात राम मंदिराचा आराखडा समोर येण्याची शक्यता आहे. या आराखड्याच्या माध्यमातून राम मंदिराची बांधणी कशी केली जाईल, याबाबतची झलक आपल्या समोर येऊ शकते.

.. म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले इराणचे आभार

अनेक वास्तुशास्त्र अभ्यासक अयोध्या येथील राम मंदिर परिसरात कशा पद्धतीने मंदिरांची बांधणी करावी, याबाबतचा आराखडा देणार आहेत. राम मंदिराची उभारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या वरिष्ठांसमोर मंदिराच्या बांधकामासंदर्भातील डिझाईनचे प्रजेंटेशन देण्यात येणार आहे. यातून राम मंदिराच्या आखणीबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.  
ट्रस्टच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रसिद्ध कंपनीने अयोध्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या मंदिराच्या बांधकामासाठी टीम तयार केली असून परिसरातील अभ्यास करुन ही टीम मंदिराचे काम घेण्याबाबत उत्सुकता दाखवत आहे.  67.7 एकर जागेत मंदिराची उभारणा करण्यात येणार आहे.  

पाकिस्तानकडून पुन्हा नापाक कृत्य ; भारतीय राजदूतांना धमकावण्याचा प्रयत्न

मंदिराचे डिझाइन विश्व हिंदू परिषद (VHP) च्या डिझाइनच्या अनुषंगाने उभारण्याचा तर्कही लावला जात आहे. मात्र मंदिरासह अन्य परिसरात  पार्किंग, तीर्थ यात्रेला येणाऱ्या भाविकांची व्यवस्था, किचन, गौशाला, म्युझियम, प्रदर्शनी आणि विश्रामगृहाच्या बांधणीचे स्ट्रक्चरचे काम वेगवेगळ्या कंपनीकडे देण्याचा विचार ट्रस्टकडून करण्यात येत आहे.  
अंतिर 'ले आउट' नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यात येईल. तसेच त्यांच्याहस्ते भूमीपूजन करुन मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल, अशी माहितीही ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास यांनी दिली आहे. 2022 च्या राम नवमीपर्यंत मंदिराचे काम पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ram mandir structure presentation in next week