esakal | राम मंदिराच्या भूमी पूजन कार्यक्रमावर दहशतवादी हल्ल्याचे सावट
sakal

बोलून बातमी शोधा

Ram mandir

5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत राम मंदिराचे भूमीपूजन करणार आहेत. याच दिवशी 2019 ला काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आलं होतं. याचा निषेधम म्हणून पाकिस्तानमध्ये काळा दिवस पाळण्यात येणार आहे. 

राम मंदिराच्या भूमी पूजन कार्यक्रमावर दहशतवादी हल्ल्याचे सावट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिरचे भूमीपूजन 5 ऑगस्टला होणार आहे. या कार्यक्रमावर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. सुरक्षा एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या भूमी पूजनाच्या कार्यक्रमावेळी दहशतवादी हल्ला होऊ शकतो. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय याचा कट रचत असून पाकिस्तानी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊऩ भारतात पाठवलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

आयएसआयने लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांना या हल्ल्यासाठी तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. भारताची गुप्तचर संघटना रॉच्या माहितीनुसार पाकिस्तानने तीन ते पाच दहशतवादी पाठवले आहेत. भूमी पूजना्या कार्यक्रमासह स्वातंत्र्यदिनीही घातपाताचा कट रचला असल्याचंही म्हटलं जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जम्मू काश्मीर आणि अयोध्येत कडक उपाययोजना केल्या आहेत. 

हे वाचा - चीन-अमेरिका वाद टोकाला; अमेरिकेने ध्वज उतरविला

रिपोर्टनुसार आयएसआयने दहशतवाद्यांना वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करण्याच्या सूचना दिल्याचे समजते. या कार्यक्रमातील व्हीआयपी लोकांना टार्गेट करण्यास सांगण्यात आलं आहे. या कटात सहभागी असणारे दहशतवादी देशात घुसले असल्याचंही म्हटलं आहे. 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत राम मंदिराचे भूमीपूजन करणार आहेत. याच दिवशी 2019 ला काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आलं होतं. याचा निषेधम म्हणून पाकिस्तानमध्ये काळा दिवस पाळण्यात येणार आहे. दहशतवादी याच दिवशी हल्ला करण्याचा कट रचत असल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचं वृत्त जनसत्ताने दिलं आहे. 

हे वाचा -अमेरिका-चीन संबंधांचे काटे उलट्या दिशेने

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला भूमीपूजन करतील आणि पहिली वीट रचतील. या समारंभाला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भूमीपूजन हे एखाद्या सणाप्रमाणे साजरं करण्याची योजना आहे. असंही म्हटलं जात आहे की देशात घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये यावेळी दिवे आणि मेणबत्ती प्रज्वलित करण्याचे आयोजनही केलं जाऊ शकतं.