बलात्कार आणि खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी बाबा राम रहिम पॅरोलवर जेलबाहेर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 November 2020

राम रहिम हे बलात्कार आणि खून अशा गंभीर गुन्ह्यांच्या अंतर्गत तुरुंगात आहेत.

चंदिगड : चंदिगडमधील डेरा सच्चा सौंदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम चांगलेच चर्चेत आले होते. मेसेंजर ऑफ गॉड नावाचे चित्रपट देखील त्यांनी काढले होते. चमकोगिरी करण्यात तसे हे बाबा सुरवातीपासूनच पटाईत होते. मात्र, त्यांना बलात्कार आणि खून प्रकरणात अटक करण्यात आली होती. आणि आता मिळालेल्या माहितीनुसार, बाबा राम रहीम हा एक दिवसाच्या सिक्रेट पॅरोलवर बाहेर आला होता.

हेही वाचा - पतीचे गर्लफ्रेंडसोबत लग्न लावून स्वत: घेतला घटस्फोट; उदार पत्नीचं सोशल मिडीयावर कौतुक

रामरहिम हे बलात्कार आणि खून अशा गंभीर गुन्ह्यांच्या अंतर्गत तुरुंगात आहेत. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या त्यांना पॅरोल मंजूर झाला आहे. त्यांचा हा पॅरोल 24 ऑक्टोबर रोजी मंजूर करण्यात आला होता. आणि आता बाबा राम रहिम हे तुरुंगाच्या बाहेर असणार आहेत. 

बाबा रामर रहिम हे खून आणि बलात्कार प्रकरणात रोहतक तुरुंगात सध्या शिक्षा भोगत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा राम रहिम यांना आपल्या आईला भेटण्यासाठी हा पॅरोल मिळाला आहे. राम रहिम यांची आई सध्या गुरुगममधील रुग्णालयात आहेत. त्या आजारी असल्याने त्यांना दवाखान्यात ठेवण्यात आलं आहे. मात्र, या भेटीवेळी बाबा राम रहिम फरार होऊ नयेत म्हणून मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. 

हेही वाचा - मागील आठ वर्षांत देशभरातून तब्बल 4.39 कोटी बोगस रेशन कार्ड्स रद्द

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळपर्यंत राम रहिम आपल्या आईजवळ होता. त्यांच्या सुरक्षेसाठी हरियाणा पोलिसांनी तीन तुकड्या तैनात केल्या आहेत. यापुर्वीही रामरहिमला पॅरोल देण्याची चर्चा झाली होती मात्र सरकारने त्यास नकार दिला होता. पण आता परत त्याला पॅरोल मंजूर केल्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ram rahim got secret parole for a day on 24 october