Ram Temple Staff Verification : राम मंदिरातील कर्मचाऱ्यांचे चारित्र्य तपासणार अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचा मोठा निर्णय

Police Verification and Character Certificates Made Mandatory : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील सर्व कर्मचाऱ्यांची १०० टक्के पडताळणी करण्याचा निर्णय श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने घेतला आहे.
Ram Temple Staff Verification

Ram Temple Staff Verification

esakal

Updated on: 

अयोध्या, ता. २ (पीटीआय) : येथील श्रीराम मंदिरातील देणगी गैरव्यवहारानंतर खडबडून जागे झालेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मंदिरातील सर्व कर्मचाऱ्यांची १०० टक्के पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पोलिसांकडून पडताळणी, चारित्र्य प्रमाणपत्र आणि कुटुंबाच्या सविस्तर माहितीचाही समावेश आहे.

ट्रस्टकडून सुरक्षेचे उपाय वाढविण्यात येत आहेत. ट्रस्टने कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती मागविली असून त्यात त्यांचे कुटुंबीय व नातेवाइकांची माहिती द्यावी लागेल. पोलिसांची पडताळणी व त्यांच्याकडून मिळालेले चारित्र्य प्रमाणपत्र कर्मचाऱ्यांना सादर करावे लागेल. या वर्षी जूनमध्ये राम मंदिरातील देणग्यांचा गैरव्यवहार उजेडात आला होता.

Ram Temple Staff Verification
Kolhapur Illegal Lending : कोट्यवधींची माया; अालिशान घराची छाया सावकारीतून कमाई ; रिल्सद्वारे महिलेवर दहशत; बेरोजगारीवर मात करण्याचा फंडा

याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी सध्या कोठडीत असून गेल्या आठवड्यात त्यांच्याविरोधात सुमारे ७० हजार पानांचे आरोपपत्रही सादर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर भविष्यात गैरव्यवहाराची घटना टाळण्यासाठी ट्रस्टकडून खबरदारी घेतली जात आहे. मंदिराचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, निवृत्त एअरमार्शल जितेंद्र मिश्रा यांनी गेल्या महिन्यात पदभार स्वीकारला.

त्यानंतर त्यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांच्या पडताळणीची मोहीम सुरू आहे. मंदिर प्रशासनातही मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले असून माजी सरचिटणीस चंपत राय व ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा व गोपाल राव यांचाही समावेश आहे. मंदिर प्रशासनाच्या व्यापक पुनर्रचनेचा भाग म्हणून ट्रस्टने कर्मचाऱ्यांवर देखरेख वाढवली अाली आहे.

Ram Temple Staff Verification
T20 World Record : ख्रिस गेलचा १७५ धावांचा विक्रम उद्ध्वस्त, Lhuan-Dre Pretorius ने रचला इतिहास; २८चेंडूंत १३८ धावा

श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने घेतलेले निर्णय मंदिराशी संबंधित सर्वांना मान्य असतील. मंदिरात सर्व पूजाअर्चा व्यवस्थित सुरू असून देणग्याही योग्यपणे स्वीकारल्या जात आहेत. दर्शन व आरतीसाठी मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविक येत आहेत. - दिनेश दास, सदस्य, श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com