रामायण पाहून आठवणींना उजाळा, जावडेकर म्हणाले...

ramayan
ramayan

नवी दिल्ली : कोरोनाच्या जागतिक साथीच्या मुकाबल्यासाठी १४ एप्रिलपर्यंत पुकारण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाउन मुळे घराघरांमध्ये सक्तीने बंद होऊन राहावे लागणाऱ्या नागरिकांसाठी दूरदर्शनने आजपासून (शनिवार) रामायण या गाजलेल्या मालिकेचे पुनःप्रसारण करण्यास सुरवात केली. यामुळे अनेकांच्या आठवणींना उजाळा मिळाला असून, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही मी रामायण पाहत आहे, तुम्ही असा प्रश्न केला आहे. ट्विटर आणि गुगलवरही रामायणचा ट्रेंड आहे.

प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी रामायण, महाभारत सुरु होत असल्याची माहिती दिली होती. त्यापाठोपाठ मुलांसाठी कॉमिक्स बुक या मालिकाही प्रसारित करण्यात येतील असेही जावडेकर यांनी सांगितले होते. जगातील सर्वात लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिकांपैकी असलेली रामायण ही महामालिका दूरदर्शनवर सर्वप्रथम १९८७ मध्ये प्रसारित झाली होती त्याकाळात ही मालिका इतकी लोकप्रिय होती की तिचे प्रसारण सुरू असताना रस्त्यांवर शुकशुकाट पसरत असे. त्या मालिकेची लोकप्रियता आजही कायम असल्याचे जाणवल्याने केंद्राने पुनःप्रसारणाचा निर्णय घेतला आहे. 

आजपासून डीडी नॅशनल वाहिनीवर सकाळी नऊ ते दहा आणि रात्री नऊ ते दहा या वेळेत रोज दोन भाग प्रसारित करण्यात आली. ही मालिका पाहताना अनेक फोटो काढून ट्विट केले असून, आपल्या मुलांसह आता रामायण पाहत असल्याचे म्हटले आहे. रामानंद सागर लिखित आणि निर्मित मालिका दूरदर्शन वर २५ जानेवारी १९८७ ते ३१ जुलै १९८८ या कालावधीत प्रसारित करण्यात आली होती त्यानंतर २००८ आणि २०१२ मध्ये खासगी वाहिन्यांनी तिचे पुन्हा प्रसारण केले. रामायणामध्ये अरुण गोवील, दीपिका चिखलिया, दारासिंह, ललिता पवार, बाळ धुरी यांनी प्रमुख पात्रांच्या भूमिका केल्या होत्या. पुढे रामजन्मभूमी आंदोलनात भाजपने यातील अनेकांना संसदेवर निवडून आणले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com