

मथुरा वृंदावनातील संत प्रेमानंद महाराज हे सतत त्यांच्या विधानांमुळे, भक्तांमुळे चर्चेत असतात. आता त्यांच्याबाबत जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी मोठं विधान केलंय. प्रेमानंद महाराज चमत्कारी संत नाहीत. मी थेट आव्हान देतो की जर ते खरंच चमत्कार करत असतील तर त्यांनी समोर येऊन संस्कृतमध्ये बोलून दाखवावं. जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांचं मत व्यक्त केलं आहे.