Ramdas Athawale Birthday : रामदास आठवलेंची ती इच्छा देशातल्या प्रत्येक पत्नीच्या चेहऱ्यावर हसू आणेल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Athawale Birthday

Ramdas Athawale Birthday : रामदास आठवलेंची ती इच्छा देशातल्या प्रत्येक पत्नीच्या चेहऱ्यावर हसू आणेल!

भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा आज वाढदिवस. २५ डिसेंबर १९५९ रोजी सांगली जिल्ह्यातील अगलगाव या गावात आठवले यांचा जन्म झाला. रामदास आठवलेंच्या लहानपणीच वडिलांचे छत्र हरविले. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांची आई हौसाबाई काबाडकष्ट करीत होती.

प्राथमिक शिक्षण ढालेवाडीत (तासगाव, जि. सांगली) झाल्यानंतर पुढे काकांकडे मुंबईत शिक्षण घेण्यासाठी गेले. पुढे वडाळ्याच्या सिद्धार्थ विहार वसतिगृहात राहायला गेले. त्यांची तेथे खऱ्या अर्थाने जडणघडण झाली. इ.स. १९७२ मध्ये दलित पॅंथरची स्थापना झाली. ते पॅंथर्समध्ये सक्रिय झाले. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ती व सहकारी मंडळी होती. पॅंथर्समुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्यांच्यात पॅंथर्सचा झंझावात निर्माण झाला.

हेही वाचा: Ramdas Athawale Birthday : आठवलेंसोबत घेऊ नका पंगा कारण ते कवितेतून करतात दंगा... वाचा भन्नाट कविता...

रामदासजींचे त्यांच्या पत्नीवर अफाट प्रेम आहे. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी ते दाखवून दिले आहे. अशीच एक इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. काय होता तो किस्सा पाहुयात.

मातृदिनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या राजमती नालगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्याला रामदास आठवलेंनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमावेळी रामदासजींनी आईबद्दलच्या अनेक आठवणी सांगितल्या होत्या.

‘मी ६ महिन्यांचा असताना माझे वडील मुंबईला होते. तेव्हा त्यांना अचानक ताप आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. माझी आई शेतावर काम करत राहिली. माझ्या मुलाने बाबासाहेबांसारखे शिकावे, मोठे व्हावे असे तिला वाटायचे. एक दिवसही शाळेत न गेलेल्या माझ्या आईला मुलाने शिकले पाहिजे असेच नेहमी वाटायच, असे आठवले म्हणाले होते.

हेही वाचा: Maharashtra Politics: विजय शिवतारे यांचा मोठा गौप्यस्फोट; एकनाथ शिंदेंच्या मनात...

याच कार्यक्रमात त्यांनी “मदर्स डे आहे, आईचा दिवस आहे. पण जसा आईचा दिवस आहे, तसा वाईफ डे सुद्धा असायला हवा, अशी इच्छाही व्यक्त केली होती. कारण, आपल्या पत्नींचं आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचं स्थान असतं. त्यांचं आपल्याला घडवण्यात फार मोठं योगदान असते, असेही ते म्हणाले होते.

रामदासजी आपल्या पत्नीला कामात मदत करतात असं त्या स्वतः स्पष्ट करताना दिसतात. ‘घरात भाजी आणायचं काम माझंच असतं. मी आणतो भाजी कारण मला लागते ताजी., असेही ते एका मराठी कार्यक्रमात म्हणाले होते.

हेही वाचा: Sanjay Shirsat : 'शिवसेना संपेल तेव्हा संजय राऊत हे शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील'

रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले या ब्राह्मण समाजातील आहेत. रामदास आठवले आणि सीमा आठवले यांचा विवाह 1992 साली झाला. त्यांनी सुक्ष्मजीवशास्त्र विषयात विज्ञान शाखेतील पदवी प्राप्त केली आहे. 2015 पासून त्या रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) महिला आघाडीची धुरा सांभाळत आहेत. त्यांनी अनेक राजकीय चढ-उतारात आपले पती रामदास आठवले यांची खंबीर साथ दिली आहे. 

घराची मिनिस्टर या सारख्या एका टिव्ही कार्यक्रमात रामदास आठवले आणि सिमा आठवले सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमातही रामदासजींनी ' माझ्या लग्नाची तारीख आहे सोळा, म्हणून हिच्यावर होता माझा डोळा', असा उखाणा घेतला होता.