Ramdas Athawale Birthday : आठवलेंसोबत घेऊ नका पंगा कारण ते कवितेतून करतात दंगा... वाचा भन्नाट कविता...

आज आपण त्यांच्या काही विशेष गाजलेल्या कवितांची लिस्ट बघणार आहोत.
Ramdas Athawale Birthday
Ramdas Athawale Birthdaysakal

 भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा आज वाढदिवस. २५ डिसेंबर १९५९ रोजी सांगली जिल्ह्यातील अगलगाव या गावात त्यांचा जन्म झाला. लहानपणीच रामदास आठवले वडिल वारले. त्यामुळे त्यांच्या आईनेच त्यांना लहानाचं मोठं केलं.

आठवलेंचं लहानपण अत्यंत संघर्षात गेलं.. १९७१ मध्ये शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली. त्यांनी नेहमी अन्याय, अत्याचाराविरोधात आवाज उठवला. आज ते यशस्वी राजकारणी आहे.

राजकारणाच्या पलीकडे आठवले त्यांच्या या एका विशेष छंदासाठी ओळखले जातात. ते म्हणजे कवितांचा छंद. त्यांच्या कविता या नेहमी विशेष चर्चेत असतात. त्यांच्या कविता करण्याच्या स्टाईलचे आजही अनेक चाहते आहे.

आज आपण त्यांच्या काही विशेष गाजलेल्या कवितांची लिस्ट बघणार आहोत. (Ramdas Athawale Birthday check list of his amazing poems )

१. निवडणूक आयोगाने जेंव्हा धनुष्यबाण गोठवले

तेंव्हा उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले!

निवडणूक आयोगाने शिवसेना नाव गोठवले

कारण उद्धव ठाकरेंनी महायुती च्या मागे लागून

एकनाथ शिंदेंना आमच्या कडे पाठवले !

२. 'ज्यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्तेचे बंद केलेले आहे धंदे;

त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे

आणि त्यांचे सहकारी आमदार आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे खंदे

आणि आता ते राहिले नाहीत अजिबात अंधे,

म्हणून आता आमच्या सोबत येत आहेत एकनाथ शिंदे

Ramdas Athawale Birthday
Ramdas Athawale : सोनियांनीच राहुल गांधींना पंतप्रधान होऊ दिलं नाही; रामदास आठवलेंचा मोठा गौप्यस्फोट

३. “आदरणीय महोदय,

मैं तो अन्याय के खिलाफ लढा हूँ,

इसलिए आपको बधाई देने के लिए खडा हूँ,

आपका अनुभव बहुतही बडा है,

इसलिए आपने संघर्ष का पहाड चढा है,

मेरे पार्टी का मैं हू अकेला,

लेकीन मेरे हाथ में है संविधान का पेला,

मैं तो हूँ आपका सच्चा चेला,

मुझे मत छोडो अकेला.

जिन्होंने उपराष्ट्रपती का सर किया है गड,

उनका नाम है धनकड

हमें मिलकर उखाड देनी है विषमता की जड,

इसमें जरूर सफल होंगे आदरणीय धनकड

हाऊस में जो सदस्य करेंगे फॅक्शन,

उनके उपर होनी चाहिए कडी अॅक्शन

हमें तो मजबूत करना हैं भारत नेशन,

क्योंकी हंगामा करने की हमें नही चाहिए फॅशन”

Ramdas Athawale Birthday
Ramdas Athawale : देश संविधानाने जोडलेला आहे : रामदास आठवले

४. बुद्धाने चीनला शिकविली करूणा

पण चीन मधून कसा आला इथे कोरोना

भारतातून बौद्ध धम्म चीन मध्ये गेला

आणि चीन बुद्धमय झाला

पण आता चीन कोरोनामय झाला

कोरोनाच्या तोंडावर आपण लावूया ताला

कोरोनाचा साफ करून टाकूया आपण गंदा नाला

मी तर आहे `जय महाराष्ट्र, जय भारत` `जय भीम`वाला

मग इथे कसा आला रे हा गद्दार साला

फेकून देऊया आपण गटारात कोरोनाची भयंकर माला

कोरोनाच्या पोटात घुसवून टाकूया आपण धारदार भाला

५. मनामध्ये सर्वांनीच ठरवा

आणि कोरोनाला आहे तिथेच हरवा

आपले अंगण स्वच्छ सारवा

आणि कोरोनाला हाटवा

त्या झाडावरून ओरडतो आहे कोरोनाचा पारवा

त्याची अचूक शिकार करायची ठरवा

लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना पोटभर घास भरवा

पण कोरोनाला जरूर हारवा

जास्त करू नका घरामध्ये गारवा

आणि घराच्या बाहेर काढू नका गर्दीचा कारवा!

६. पुतिनचा बिघडला आहे ब्रेन....

म्हणून परेशान आहे युक्रेन

Ramdas Athawale Birthday
Ramdas Athawale: भाजपसोबत का गेलो... रामदास आठवलेंनी दिलं काव्यमय शैलीत उत्तर, म्हणाले...

७. मनामध्ये सर्वांनीच ठरवा

आणि कोरोनाला आहे तिथेच हरवा

आपले अंगण स्वच्छ सारवा

आणि कोरोनाला हाटवा

त्या झाडावरून ओरडतो आहे कोरोनाचा पारवा

त्याची अचूक शिकार करायची ठरवा

लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना पोटभर घास भरवा

पण कोरोनाला जरूर हारवा

जास्त करू नका घरामध्ये गारवा

आणि घराच्या बाहेर काढू नका गर्दीचा कारवा!

८. चला हवा येऊ द्या

पण कोरोनाला लवकर जाऊ द्या

`कोरोना मुर्दाबाद`चा नारा मला देऊ द्या

कोरोनाचा बदला मला घेऊ द्या

आपणच व्हा आपले रक्षक

कोरोनाचे होऊ नका भक्षक

Ramdas Athawale Birthday
Ramdas Athawale: प्रकाश आंबेडकरांना आजही ऑफर, त्यांनी तिकडे जाऊ नये; आठवलेंचं स्पष्टीकरण

९. रामदास आठवले कोण आहे...

अरे तो माणसा-माणसाला जोडणारा फोन आहे...

रामदास आठवले कोण आहे?

तो तर दलित चळवळीचा बोन आहे...

रामदास आठवले कोण आहे?

तो तर दलित-सवर्णांना जोडणारा झोन आहे...

१०. मंत्रिपद मिळाले आहे मला...

ते कसे मिळावायचे, याची येते मला कला..

म्हणूनच हा समाज इथे आला...

कारण मी आहे सच्चा जयभीमवाला

११. देश की गरिबी नहीं हटी,

इसलिए अरुण जेटलीजीने लाई है GST

GSTकानून जब हो जाएगा अपना,

तब होगा पुरा बाबासाहेब आंबेडकर का सपना!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com