आठवले भाजप-सेनेतील नवे संवाददूत? जाहीर केला नवा फॉर्म्युला

वृत्तसेवा
Monday, 18 November 2019

राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना केंद्रिय मंत्री रामदास आठवले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षातील संवाददूत बनले आहेत. त्यांनी सत्ता स्थापनेचा नवा फॉर्म्युला जाहीर केला असून यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी बोलणे झाल्याचा दावाही केला आहे.

नवी दिल्ली : राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना केंद्रिय मंत्री रामदास आठवले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षातील संवाददूत बनले आहेत. त्यांनी सत्ता स्थापनेचा नवा फॉर्म्युला जाहीर केला असून यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी बोलणे झाल्याचा दावाही केला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

आठवले म्हणाले की, माझे संजय राऊत यांच्याशी बोलणे झाले असून शिवसेना आणि भाजप या दोन पक्षात सत्ता स्थापने संदर्भात तडजोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी त्यांना भाजपने तीन वर्षे आणि शिवसेनेने दोन वर्ष मुख्यमंत्री पद घेऊन तडजोड करावी असे सांगितले आहे. जर शिवसेनेला हा प्रस्ताव मंजूर असेल तर आपण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

गांधी कुटुंबाच्या सुरक्षा प्रश्नावरून काँग्रेस संसदेत आक्रमक

काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्यापेक्षा भाजपसोबत जावे- कुमारस्वामी

दरम्यान, राज्यात सध्या कोणाचेही सरकार नसून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी भाजप आणि सेनेने युती करत निवडणुक लढविली होती. निकालात युतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. पंरतु, सत्ता स्थापन करताना सत्तेच्या समसमान वाटपावरून भाजप सेनेमध्ये तणाव निर्माण झाला आणि सेना मुख्यमंत्री पदावर अडून बसली. यामुळे राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने सत्तापेच निर्माण झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramdas Athawale suggested new formula for BJP and Shivsena