Covid -19 : बुस्टर डोसची सध्यातरी गरज नाही : गुलेरिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dr randeep guleria

Covid -19 : बुस्टर डोसची सध्यातरी गरज नाही : गुलेरिया

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

नवी दिल्ली : कोविड -19 (Covid 19) च्या पहिल्या दोन लाटांच्या तुलनेत देशात तिसरी लाट येण्याची शक्यता नाही, असे मत दिल्ली एम्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr Randeep Guleria) यांनी मंगळवारी व्यक्त केले. दरम्यान, संसर्गामध्ये वाढ न होणे हे सूचित करते की, लसींच्या दोन्ही मात्रा विषाणूपासून संरक्षण प्रदान करीत आहेत, त्यामुळे सध्यातरी तिसऱ्या बूस्टर डोसची आवश्यकता नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

इंडियन काउंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी लिहिलेल्या 'गोइंग व्हायरल: मेकिंग ऑफ कोव्हॅक्सीन - द इनसाइड स्टोरी' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला संबोधित करताना डॉ. गुलेरिया म्हणाले की, लसीमुळे कोणत्याही प्रकारच्या मोठ्या लाटेची शक्यता नसून रूग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या लोकांची संख्यादेखील दिवसेंदिवस कमी होत आहे. कोविडच्या पहिल्या दोन लाटांच्या तुलनेत तिसऱ्या तीव्रतेची लाट देशात येण्याची शक्यता नाही. कालांतराने महामारी स्थानिक रोगाचे रूप घेईल. संक्रमित होण्याची प्रकरणे येत राहतील, पण प्रादुर्भाव खूप कमी होईल असेही ते म्हणाले.

हेही वाचा: औरंगाबाद : लसीकरण वाढवण्यासाठी प्रशासनाने कसली कंबर

नीती आयोगाचे आरोग्य विभागाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, तिसऱ्या डोसचा निर्णय विज्ञानाच्या आधारे घेण्यात यावा. रूपा पब्लिकेशन्सच्या पुस्तकाविषयी बोलताना भार्गव म्हणाले की, कोविड-19 विरूद्ध संरक्षणासाठी लसीच्या बूस्टर डोसची आवश्यकता असल्याचे समर्थन करण्यासाठी अद्याप कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात गेल्या दीड वर्षात शास्त्रज्ञ, सरकार आणि लोकांच्या कामात स्पष्टता आणि गांभीर्य दिसून आले आहे. नागरिकांनी साथीच्या रोगापासून अनेक गोष्टी शिकल्या आहेत. तसेच यामुळे आरोग्याच्या पायाभूत सुविधादेखील मजबूत झाल्या आहेत.

loading image
go to top